पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१७]

आगबोटीतून प्रवास करणे ही धाडसाची कामे करण्यास असल्या मुलांचे मन घेत नाही, उलट आपल्या पत्नीचे व लहान मुलांचे कसे होईल ही चिंता सदैव त्यांच्या मनाला असते. बालविवाहामुळे मुलांना आपल्या आयुष्यांत कांहीं मजा वाटेनाशी होऊन तीं अद्वितीयताशून्य बनतात. ज्या वयांत अंगांत जोम रसरसलेला असावयाचा त्याच वयांत निराशेचे साम्राज्य पसरणे किती घातुक आहे! कृपमंडूकासारखी वृत्ति पिढयानपिढ्या चालत आल्यामुळे इतकी दृढ झालेली आहे की, हिंदु लोक हे भित्रे अशी इतर लोकांची पक्की समजूत होऊन बसलेली आहे. बालविवाहामुळे स्त्रियासुद्धा स्वावलंबनविरहित व स्वतंत्रताशून्य झालेल्या आहेत. या गुणांचा विकास होण्यास मुळी अवसरच सांपडत नाही. कारण त्यापूर्वीच त्यांचे लग्न होऊन त्या सासुरवास भोगू लागतात. हिंदु स्त्रिया अतिशय विनयशील व असल्या स्थितीत संतोष मानणाऱ्या अशी सर्वजण स्तुति करतात. परंतु त्यामुळे समाजोत्कर्ष होत नसून उलट अवनति होत आहे. बालविवाहामुळे आयुर्मर्यादाही कमी होते. मागच्या पिढीत,जरी बालविवाह झाले असले, तरी बालमातापितरें अशी संज्ञा नव्हती, परंतु आतां ती असल्यामुळे ही अनिष्ट स्थिति झाली आहे.
 बालविवाहाचा चवथा, सर्वांत भयंकर व काळजास