पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१६]

तरुणास उच्च शिक्षणास अजीबात फांटा द्यावा लागून कॉलेज सोडावे लागले. अशी आणखी ही कित्येक उदाहरणे असतील. मुलींची स्थिति तर याहूनही शोचनीय आहे. त्यांना १०।१२ वर्षांच्या अवधीतच शाळेला रजा द्यावी लागते व तेथेच त्यांच्या शिक्षणक्रमाचा अंत होतो. एवढया अवधीत कितीशी ज्ञानप्राप्ति होणार ? विवाहानंतर पतीने कितीही निश्चय केला तरी परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे अभ्यास वाढणे शक्य नसते. शिवाय या वयांत मुलगे बहुतेक कॉलेजांत, व मुलींचे सासर व माहेर, मंगळागौरी व महालक्ष्म्या यांत वेळ जात असतो. मग पतिपत्नीचा परिचय होण्यास अवकाश कोठे सांपडतो ? मुले झाल्यावर सुद्धां पुरुषांनी नेटाने अभ्यास करून सिद्धि मिळविल्याची व लहानपणी अक्षरशत्रु असलेल्या स्त्रियांनी विवाह झाल्यावर विद्वान् होऊन देशास ललामभूत झाल्याची उदाहरणे आहेत, नाहीत असे नाही. परंतु ती अपवादादाखलच समजावयाची.
 बालविवाहामुळे तिसरें अनहित म्हटलें म्हणजे हे की, त्याचा हिंदुलोकांच्या स्वभावावर दुष्परिणाम झालेला आहे. लहानपणी विवाह झालेल्या मुलांची पराक्रमाकडे प्रवृत्ति होत नाही. एरोप्लेनमध्ये निर्भयपणे बसणे, ध्रवाचा शोध लावण्याचा प्रयत्न, कांचेच्या तळाच्या बोटींत बसून समुद्रांतील चमत्कार पहाणे किंवा पाण्याखालून चालणाऱ्या