पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१५]

घटकेस विशेष प्रकारे म्हणता येणार नाही. मुलगे प्रौढ होतात, परंतु मुलींचे वय त्या मानाने बरेच कमी असल्यामुळे विषमविवाह होतात. बालविवाह शास्त्रसंमत नाहीं, हे तर सिद्ध झाललेंच आहे. त्यापासून शारीरिक ऱ्हास व राष्ट्रीय अवनति ही तर होतातच; परंतु सामाजिक अनहितही कित्येक प्रकारांनी होते. त्यांपैकी पहिलें:
 अकाली मातृपद प्राप्त झाल्यामुळे लहान मुलांचे संगोपन अज्ञ बालिकांना करण्याचा प्रसंग येतो. त्यांच्या ठिकाणी योग्य तो मनोनिग्रह नसल्यामुळे मुलांची आबळ होते. द युरोपियन लोकांच्या मुलांची आपल्या मुलांशी जर तुलना केली तर जमीनअस्मानाचा फरक दृष्टीस पडतो. आमच्यांतील मुलें जोमदार व मांसल न दिसतां अशक्त व फिकटलेली दिसतात. गतवर्षी झालेल्या खानेसुमारीवरून ५-१५ वर्षांच्या मुलींच्या मृत्युसंख्येचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आढळले. हा बालविवाहाचा परिणाम आहे.
 दुसरे अनहित असें आहे की, मुलांच्या व मुलींच्या उभयतांच्या शिक्षणांत बालविवाहामुळे व्यत्यय येतो. एकदां विवाहशृंखला पायांत पडली की मुलांचे विचार निसर्गतः त्या बाजूला वळतात व त्यांच्या मनाची एकतानता नष्ट होते. मला असें एक उदाहरण माहीत आहे की, २१ वर्षांच्या अवधीत २।३ मुले झालेली तशांत बालपत्नीचा व त्या अर्भकांचा अजारीपणा, यामुळे एका