पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१४]

अवश्य धरावा. लग्नांतील दुसऱ्या अशा कित्येक चाली व प्रकार आहेत. परंतु विनाकारण विस्तारभयास्तव मी सांगत नाही. तथापि आठ आठ दिवस जेवणावळींत जो निरर्थक खर्च होत असतो त्याचा उपयोग कांहीं होत नाही. वास्तविक लग्नाचा विधि किती थोडा व त्याचे खर्चाचे स्वरूप किती मोठे ? त्यामुळे खरें सौख्य कोणासच वाटत नाही. रात्रंदिन खटाटोप व व्याह्याजांवयांची मन धरणी-लग्नसमारंभाला फार बेताचे स्वरूप आले पाहिजे. यांत बालवधूवरांना तर त्यांच्यावर केवढी मोठी जबाबदारी टाकली जाते याची बिलकुल कल्पना नसते. लग्न म्हणजे चार दिवस गडबडीत आनंदांत जातात, वाजंत्री वाजतात, एवढाच इत्यर्थ ती काढतात. टिपण पहाण्याच्या व ३६ गुण जमविण्याच्या खटपटींत पडल्यामुळे कित्येक वेळां विजोड संबंध होऊन ३६ चा आंकडा पडतो. काही संबंध तर आजन्म पश्चात्तापास कारणीभूत होत असतात. लहान १०।१२ वर्षांच्या मुलींच्या हातांत जर पुरुष आपलें जीवित देऊन बसतात तर तें सुखमय झाले नाही तर नवल काय ? आमच्यात कित्येक वधूवरांचे दर्शन प्रथम विवाहसमयींच होते. कोणाचें जरी अगोदर झाले तरी सहवासाने जशा कित्येक बारीकसारीक गोष्टी-स्वभाव-कळतात त्या समजण्यास मार्ग नाहींच. मुलांचे बालविवाह होतात असें आजच्या