पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[११]

जीवैक्य होण्यास त्यांचे प्रौढपणीं विवाह झाले पाहिजेत. प्रस्तुतची आमच्या समाजाची स्थिति पाहिली तर काहीं अपवाद खेरीजकरून बाकी सर्वत्र बालविवाहच होत आहेत. ते जोपर्यंत नष्ट होणार नाहीत तोपर्यंत समाजाची अवनत स्थिति कमी होणे शक्य नाही.
 जोपर्यंत बालविवाह प्रचलित आहेत तोपर्यंत हुंड्याची चाल सुद्धा नष्ट होणे नाही. कारण स्वतः मुलीस कांहींच मूल्य नसून तिची किंमत हुंड्यावर ठरविली जाते. यास आळा घालणे सुद्धां तरुणांकडे आहे. हुंड्याच्या चालीमुळे कांहीं कांही पोटजातींतून मुलींना आजन्म अविवाहित रहाण्याची पाळी येते. कित्येक वेळां मुली आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतात, ही किती शोचनीय गोष्ट आहे बरें ? अशा वेळी विवाहेच्छु तरुणांनी निग्रह करून आपल्या आईबापांना असल्या प्रकारांपासून परावृत्त केलें पाहिजे. तरच काही उपाय आहे. नुकताच "Times of India Illustrated Weekly " मध्ये “ Practical Social Reform " या सदराखाली थोडासा मजकूर वाचण्यांत आला होता तो लक्षात ठेवण्यासारखा आहे, तो असाः-
 “ The Nobo Banga writes that Dr. Prabodh Kumar Basu, L. M. S., has set an example to young Benyal by returning Rs. 900 to to the bride's party on the occasion of his wed-