पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१०]

Dr. Stall याने 'What a young man ought to be ' यांत म्हटले आहेः-
 “Remember that a marriage is not for a day or year, not simply for the period of prosperity but for life, for the time of adversity when in the darkness you will need somebody to stand by you, that each may be to the other, an inspiration, a help and a stay."
  म्हणजे "लग्नाने स्त्रीपुरुषांच्या ज्या गांठी पडत असतात त्या एका दिवसापुरत्या, वर्षापुरत्या अथवा आपल्या सुखाच्या दिवसापुरत्याच केवळ नसून त्या जन्माच्या पडत असतात. विपत्काली आणि संकटसमयी कोणी तरी आपल्या जिव्हाळ्याचा आपल्याजवळ असावा लागतो एतदर्थ त्या गांठी पडत असतात; व पाडावयाच्याही असतात, व त्याही अशाकरितां की, परस्परांकडून परस्परांस स्फूर्ति, साहाय्य आणि सुख मिळावे म्हणून.”
{{gap}]विवाहामुळे पतीच्या स्वाभाविक सद्गुणांत जर काही कलंक असला तर तो नष्ट करण्यास भार्येचा सहवासच कारणीभूत होतो. तसेंच पत्नीचा जो नाजुक व केव्हां केव्हां विकारवश बनणारा स्वभाव असतो तो बदलून विचारस्थैर्य येण्यास पतीचा सहवास कारणीभूत होत असतो.
 परंतु वधूवरांचे स्वभाव एकमेकांस पटण्यास व त्याच