पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[९]

चर्याबरोबर मानसिक ब्रह्मचर्यही यथायोग्य पाळिलें पाहिजे. गृहस्थाश्रमांत प्रवेश करण्यापूर्वी पूर्वतयारी म्हणजे, पवित्राचरणानें वीर्याचे रक्षण, शरीर कणखर, सर्वावयव परिपक्व, मन निर्मल, शांत व तें सुविचारांनी परिपूर्ण ठेवणे ही होय. गृहस्थाश्रम स्वीकारण्यास खरा व योग्य काळ मुलींना १६ वर्षांपुढे व मुलांना २० वर्षांपुढे युक्त आहे.
 सगळ्या ऐहिक सुखांचा आधार जरी लग्नावर आहे तरी योग्यप्रकारे झालेला विवाहच इहलोकींच्या सुखांतील परम सुख मानले जाते. विवाहसंबंध जडल्यावर उभयपक्ष परस्परांशी पवित्रतेने वतू लागले तर त्याचा परिणाम कांही अपूर्व होतो. संसारसुखाचा लाभ घेत असतां ज्यांत स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधतात असे जर कोणतें स्थान असेल तर ते गृहस्थाश्रमच होय. कौमार्यावस्थेत . उत्तम प्रकारे ब्रह्मचर्य जर पाळण्यांत आले तर ज्या अनेक सद्गुणांचे, प्रेमाचें व अभिमानाचे बीजारोपण मनोपवनांत झालेले असते त्यांस अभ्यासाचे उदक मिळून बनलेल्या सुंदर वृक्षाच्या मनोरम व रुचिर फलपुष्पांचा आस्वाद गृहस्थाश्रमांत आल्हादयुक्त मनाने घेतां येतो. ब्रह्मचर्यव्रताचा उपक्रम जरी बाळपणीं करावयाचा असतो तरी त्याचे योग्य नियम आणि अवश्य कर्तव्ये ही गृहस्थाश्रमांतच पाळावी लागतात.