पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[८]

१४ विद्या व ६४ कला यांत पारंगत व्हावे लागे. शिवाय ब्रह्मचर्यव्रतही कडकडीत पाळावे लागे. म्हणून शरीराची पूर्ण वाढ होण्यास अवकाश सांपडत असे. हल्ली कालमानाप्रमाणे पूर्वीचे काही राहिले नाही. नाही म्हणावयाला अलीकडे हरिद्वार येथे स्थापन झालेल्या 'ऋषिकुल' व 'गुरुकुल' या संस्था मागील काळचे स्मरण करून देतात. हल्ली शालागृहे जरी गुरुगृहांच्या ठिकाणी आहेत तरी शिक्षण नुसते एकदेशी मिळत आहे. शाळागृहांतून शिक्षणक्रम आटोपून बाहेर पडलेली मुलें जोमदार न दिसतां अगदी बलहीन दिसतात याचे कारण काय ? तर विद्यार्थिदशा संपण्यापूर्वी आमच्या मुलांना जनकाची पदवी प्राप्त होऊन दोन पैसे मिळविण्याचे सामर्थ्य येण्यापूर्वीच मुलींची लग्ने व मुलांच्या मुंजी करण्याची वेळ येते. बनारस येथील सेंट्रल हिंदु कॉलेजमध्ये विवाहित मुलगाच मुळी दाखल करीत नाहीत, असे माझ्या ऐकिवांत आहे. त्याचप्रमाणे येथील 'महिलाविद्यालयांत' ब्रह्मचर्य फंडांतून शिकणाऱ्या प्रत्येक कुमारिकेच्या पालकाकडून तिचे २० वर्षांपर्यंत लग्न करण्यांत येणार नाही अशी अट लिहून घेतली जाते. यावरून ब्रह्मचर्याची महती आपणांस कळून येईल. परंतु नुसती अविवाहित स्थितीही उपयोगी नाही. तर त्यांत शृंगारपूर्ण नाटके कादंबऱ्या यांचेही वाचन नसावें. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे शारीरिक ब्रह्म