पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७]

निपजलेना ? तसेंच विक्रमादित्य, इतिहासप्रसिद्ध शिवाजीमहाराज, बाजीराव, यशवंतराव, रणजितसिंग, असे तलवारबहाद्दर अवतीर्ण झाले. तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर, एकनाथ असे पुण्यशील महात्मे होऊन गेले. त्याच या आर्यावतीत पूर्वजांचे स्मरण करून देणारे एकही मानवरत्न चमकू नये काय ? आमच्यांत जे काही दोष उत्पन्न झाले आहेत त्यांत ब्रह्मचर्याचा लोप यास अग्रस्थान दिले पाहिजे. आमच्या पूर्वजांकडून जी काही असामान्य म्हणून कामे झाली ती ब्रह्मचर्यव्रत उत्तम प्रकारे पाळल्यामुळे त्यांच्यांत जें कांहीं सामर्थ्य उत्पन्न झाले होते त्यामुळेच झाली. “ Sound mind in a sound body" हे तत्व पूर्वकालीन लोकांच्या मनावर चांगल्या प्रकारे ठसले गेल्यामुळे तरुणपणांत व्रतस्थ राहून ते शारीरिक संपत्ति मिळवीत होते. ब्रह्मचर्याच्या ऱ्हासाने देशाची अवनति कशी होते, याचे उदाहरण पहाण्यास लांब जावयास नको. नेटाने व निग्रहानें काम करणारी माणसे आज किती आहेत ? करारीपणा, निश्चयीपणा व उत्कृष्ट मनोनिग्रह आज दिसून येत नाही. साहसाच्या नुसत्या कल्पनेने शरीरावर रोमांच उभे रहात आहेत, या गोष्टी कशाच्या निदर्शक आहेत ? पूर्वकाळी मुलाला ८ वर्षांपासून २५ वर्षांपर्यंत गुरुगृहीं रहावे लागे. एवढ्याकाळांत धर्मनीति षट्शास्त्रे वगैरेंचा अभ्यास करून