पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[६]

काल रहावे हा आहे व तें कायम ठेवण्यास लग्नपद्धति पाहिजे आहे. ही गोष्ट सत्य. परंतु त्यामध्ये क्रांति होणे जरूर आहे. Dr. Mary Wood Allen, M. D. यांनी म्हटले आहे की:-
“The youth of to-day have in their own hands the moulding of the future, not only of themselves but of the nation, by the everyday habit of their lives."
 म्हणजे “ आपल्या आयुष्यांतील रोजच्या संवयीच्या योगें केवळ आपल्या स्वतःच्याच नव्हे तर आपल्या राष्ट्राच्याही भावि स्थितीला अमुक एक प्रकारचे वळण लावणे ही गोष्ट आजच्या तरुण पिढीच्याच सर्वस्वी स्वाधीन आहे." यावरून तरुण पिढीवर केवढी महत्त्वाची जबाबदारी आहे हे सहज सुव्यक्त होते.
 गृहस्थाश्रम स्वीकारणे जरी चांगली गोष्ट असली तरी ती वास्तविक आयुष्याची इतिकर्तव्यता नाही. प्रस्तुत मुलांमुलींच्या अंतःकरणांवर विवाहविषयक विचारांचें बीज पूर्णपणे रुजलें गेलेले असल्यामुळे ब्रह्मचर्याच्या महत्वाविषयी कल्पनाही त्यांच्या मनाला शिवत नाही. वास्तविक भावि पिढीच्या उन्नतीचा पाया या ब्रह्मचर्यांत घातला जातो. मागील काळी याच भरतखंडांत पाणिनि, वाल्मीकि,कालिदास, भास्कराचार्य, गदाधरभट्ट, असे असंख्य महात्मे