Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होती. हे शहर शिंदे सरकारचे राज्यांत आहे. त्यानंतर तो दक्षि. कडे वळला. ___ त्याने दक्षिणेतील अकरा, आर्यावर्तातील नऊ व सरहद्दीवरील बऱ्याच राजांचा पराभव केला. प्रथम तो छोटा नागपूरमधून जाऊन महानदीचे खोऱ्यांतील दक्षिण कोसलचा राजा महेंद्र याचा त्याने पराभव केला. नंतर ओरिसा प्रातांचे डोंगरांतील व्याघ्र राजास त्याने जिंकले. पुढे गोदावरी तीरावरील पिष्टपुराच्या राजाचा त्याने पराभव केला. नंतर गंजम प्रांतांतील महेंद्रगिरि आणि कोतर हे डोंगरी किल्ले घेतले. व कोलेर सरोवराचे कांठावरील मंतराज राजाचा पराभव केला. पढें कृष्णा व गोदावरी या नद्यांच्या दरम्यानचा प्रांत घेतला व कांची येथील पल्लव राजाचा पराभव केला. पुढे तो पश्चिम किनाऱ्याकडे वळला व त्याने नेलोर प्रांतांतील पालक्क येथील उग्रसेन नांवाच्या पल्लव राजाचा मोड केला. परत यताना देवराष्ट्र (महाराष्ट) व एरंडपल्ल (खानदेश) हे प्रांत त्याने जिकले. याप्रमाणे दुर्गम प्रदेशांतून दोन तीन हजार मैलांची ही धाडसाची मोहीम दोन वर्षांत समुद्रगुप्ताने संपविली. (इ. स ३५०) समुद्रगुप्ताचे प्रत्यक्ष राज्य हुगळीपासून यमुना व चंबळा या नद्यापावतों पूर्व पश्चिम, व हिमालयाच्या पायथ्यापासून नर्मदेपर्यंत दक्षिणोत्तर असें पसरले होते. त्याने जिंकलेले प्रांत फारसे आ. पल्या राज्यात सामील केले नाहीत. परंतु तो पुष्कळ लूट घेऊन आला. त्याचे मांडलिक राजे होते तेः-( १) पूर्वेस गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांचे मधील समतट देश. सांप्रतचे कलकत्ता शहर याच प्रांतांत आहे. (२) कामरूप ऊर्फ आसाम. (३) समतट व कामरूप यांचे दरम्यानचा प्रांत दुवाक, म्हणजे हल्लींचे बोग्रा, दिनाजपुर, व राजशाही जिल्हे. ( ४ ) नेपाळ हल्ली प्रमाणेच तेव्हाही ते मांडलिक होते. ( ५ ) पश्चिम हिमालयाचे पायथ्याशी ल्या राज्यात सामालक राजे होश. सांप्रत