पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ वा. गुप्त साम्राज्य व पश्चिम प्रांतांतील क्षत्रप. इ० स० ३२०-४५५. चंद्रगुप्त नांवाच्या राजाने लिच्छवी वंशाच्या कुमारदेवी नांवाच्या राजकन्येशी विवाह केला. हा चंद्रगुप्त पाटलिपुत्राचा किंवा त्या नगरीचे जवळचा एक लहानसा राजा होता. त्याच्या ह्या विवाहासंबंधाने मगध देशांत त्याचे वजन वाढले, व पाटलिपुत्राचे राज्य त्याला मिळाले. त्यानंतर तो आपणास महाराजाधिराज असें म्हणवू लागला. त्याने आपल्या व आपल्या राणीच्या व लिच्छवी कुलीच्या नांवांची नाणी पाडली आणि आपल्या राज्याचा विस्तार प्रयागापर्यंत वाढविला. आपल्या नांवाचा इ० स० ३२० सालापासून त्याने शक सुरू केला. तो इ० स० ३३० किंवा ३३५ सालांत मरण पावला. मरणापूर्वी त्याने आपला मुलगा समुद्रगुप्त याने गादीवर बसावे असे ठरविले. समुद्रगुप्त हा हिंदुस्तानातील एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. गादीवर बसल्यापासून त्याने आपले राज्य वाढविण्यास सुरवात केली. त्याच्या राज्याचे वर्णन हरिषेण कवीने केले आहे. अशोकानें ६०० वर्षापूर्वी उभारलेल्या एका स्तंभावर त्याने आपल्या पराक्रमाचे वर्णन लिहून काढविले. तो स्तंभ हल्ली प्रयागाचे किल्ल्यांत ठेविला आहे. प्रथम त्याने उत्तर हिंदुस्थानांतील राजे जिंकले. त्याने ज्या नऊ राजांचा पराभव केला त्यांपैकी गणपति नाग नांवाचे राजाचा मात्र पत्ता बरोबर लागतो. त्याची राजधानी पद्मावती ऊर्फ नरवार