या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
उत्तर हिंदुस्थानांतील कुशान व दक्षिण हिंदुस्थानांतील आंध्र ही दोन्ही राज्ये एकाच वेळेस ( म्ह. इ० स० २२६ त ) लयास गेली व त्याच सुमारास इराणांतील असकिदन वंश संपून ससानियन वंशाचा उदय झाला. या सुमारास इराणी लोकांची हिंदस्थानावर स्वारी झाली असल्यास त्याबद्दल काही पुरावा उपलब्ध नाही. तिसऱ्या शतकाच्या इतिहासाबद्दल खात्रीलायक कांहीं माहिती मिळत नाही. विष्णु पुराणांत आभीर, गर्दभिल, शक, यवन व बाल्हिक वगैरे वंशांची नांवें दिली आहेत. परंतु त्यांपैकी कोणी प्रबल झाल्याचे दिसत नाही. कुाशन राजाचा अंमल काबूल व पंजाब प्रांतांत इ० स० चे पांचवे शतकापावेतों होता. त्या सुमारास हूण लोकांनी त्यांचा पूर्ण पाडाव केला. चवथे शतकाचे आरंभी त्यांचे एका राजाने, इराणचा ससानियन राजा दुसरा हारमझ यास आपली मुलगी दिली.