Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ राजा फार आशाबद्ध व क्रूर आहे. त्याच्या लढायांमुळे त्याचे सर्व लोक थकून गेले आहेत. त्याला तृप्ति म्हणून ठाऊकच नाही. आमचे आप्तवर्ग दूर राहिले. तेव्हां आपण याच्यापासून आपली सुटका करून घेतली म्हणजे आपण सुखी होऊ. याप्रमाणे त्या सर्वांनी एकविचार करून त्याचा प्राण घेण्याचा बेत केला, व एके दिवशी तो आजारी असतांना त्याच्या अंगावर रजई टाकून त्याचा कोंडमारा केला, व एक मनुष्य त्याच्या तोंडावर बसून त्याने त्याचा प्राण घेतला. कनिष्काचे राज्य इ० स० १२३ ह्या वर्षांत समाप्त झाले. त्याला वासिष्ठ व हविष्क असे दोघे मुलगे होते. ते दोघे उत्तर हिंदुस्थानचे एकामागून एक असे प्रतिनिधि होते. वासिष्ठ हा कनिष्काचे हयातीतच मृत्यु पावला. हविष्क हा कनिष्कानंतर गादीवर बसला. हविष्कानें हुष्कपूर नांवाचे शहर वसविले. त्याला हल्ली हुष्कुर असे म्हणतात. ते काश्मिरांत आहे. काश्मिर, काबूल व मथुरा हे प्रांत याच्या राज्यांत होते. हविष्काच्या नाण्यांवर ग्रीक, हिंद व इराणी देवतांची चित्रे आहेत. हविप्काचे राज्य इ० स० १४० त संपले. त्याचेनंतर वासुदेव गादीदर बसला. त्याचे नाण्यांवर शिव, नंदी व त्रिशूल आहेत. ह्यावरून हिंदु धर्माचा त्याच्यावर पूर्ण पगडा बसला होता हे सिद्ध होते. त्याचे राज्य इ० स० १७८ साली संपलें. इ० स० १६७ सालांत बाबिलन प्रांतांत भयंकर तापाचा रोग उत्पन्न झाला; तो रोग पार्थिया प्रांतांत व रोमचे साम्राज्यांत पसरला व हिंदुस्थानांतही तो आला असावा. कुशान वंशास तेव्हांपासून उतरती कळा लागली, वासुदेवानंतर उत्तर हिंदुस्थानांत कुशान वंशाचे राजांचे ताब्यांत फारसा प्रांत राहिला नाही.