Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपल्या कारकीर्दीत महान् बौद्ध परिषद भरविली. ती काश्मरािंत किंवा पंजावांत भरली असावी. ती पार्श्विक नांवाच्या भिक्षूच्या सांगण्यावरून भरवली. तिचा अध्यक्ष वसुमित्र होता, व पाटलिपुत्राहून पकडून आणलेला अश्वघोष हा उपाध्यक्ष होता. एकंदर पांचशे पंडित जमले होते. त्यांनी प्राचीन काळापासूनच्या सर्व बौद्ध ग्रंथांचे विवेचन केले. व त्यांवरून मोठमोठाले टीका ग्रंथ लिहिले. त्यापैकी महाविभाषा नांवाचा ग्रंथ अद्यापि चिनी भाषेत उपलब्ध आहे. सर्व टीका ग्रंथांच्या नकला तांब्याच्या पत्र्यावर केल्या, व त्या राजाने एक मुद्दाम स्तूप बांधून त्यांत ठेवल्या. न जाणों श्रीनगराजवळ त्या कधीकाळी अझूनही सांपडतील. कनिष्काच्या मरणाची हकीकत फार चमत्कारिक आहे. त्याचा माथर नांवाचा एक विलक्षण बुद्धिमान प्रधान होता. तो एक दिवस राजाला म्हणाला " महाराज, आपल्या सेवकाचे ऐकाल तर सर्व जगत् आपल्या ताब्यांत येईल. अष्टदिशांचे लोक आपणांस शरण येऊन आपल्या आश्रयाखाली राहातील. आपल्या सेवकाच्या म्हणण्याचा विचार करा. परंतु ते कोणास कळवू नका.” राजा म्हणाला “ बरें आहे; तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल. " नंतर त्या प्रधानाने सर्व सेनापतींना बोलाविलें व चतुरंग सेना तयार केली. जिकडे जिकडे राजाची स्वारी जाई तिकडे तिकडे सर्व लोक त्याच्या पुढे हात जोडून उभे राहात. याप्रमाणे तीन देशांचे लोक त्यास शरण आले. कानष्क राजाच्या घोड्याच्या पायाखाली सर्व वांकून जाऊं लागलें, किंवा मोडन जाऊं लागले. राजा म्हणाला, “ मा तान दिशा जिंकल्या. चवथ्या दिशेचा प्रांत मात्र मला शरण आला नाही. तो जिंकल्यावर मी कोणाशी लढाई करणार नाही. परंतु तो प्रांत कसा जिंकावा हे समजत नाही." - राजाच्या लोकांनी हे शब्द ऐकले तेव्हां ते म्हणाले, “हा