पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याने खुद्द चीनच्या वादशहाच्या मुलीची मागणी केली. ( इ० स० ९० ). हा अपमान बादशहाचा सेनापती पनचाव ह्याला सहन न होऊन, कनिष्काचे वकिलास त्याने हाकून लावले. तेव्हा त्याने सत्तर हजार फौज सी नांवाच्या सेनापतीबरोबर पामिरचे रत्स्याने चिनी लोकांवर पाठविली. त्या फौजेचे वाटेने फार हाल झाले व शेवटी पनचाव याने त्या फौजेचा पूर्ण पराभव केला. चीनचे बादशहास खंडणी देण्याचा प्रसंग कनिष्कावर येऊन पडला. यु-एची लोकांचे वेळेपासून रोम व हिंदुस्थान यांमधील व्यापारास सुरुवात झाली. हिंदुस्थानांतून रेशीम, लवंगा, वेलदोडे वगैरे किराणा माल तसेंच हिरे, माणकें व रंग देण्याच्या जिनसा रोमकडे जात असत, व तिकडून सोने येत असे. त्या सोन्याची कदफिसीजनें नाणी पाडली. ९९ साली त्याने ट्रेजन बादशहाकडे वकील पाठविला. या वेळेस रोमन लोकांची हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील लोकांना चांगली माहिती होतीसे दिसते. कनिष्काचा लौकिक तिबेट, चीन वगैरे देशांत अशोकाखालोखाल आहे. तो पुढे पुढे बौद्ध धर्माचा फार अभिमानी झाला. काश्मीर प्रांत त्याने जिंकला, व कनिष्कपूर नांवाचें नगर त्याने स्थापन केले. पाटलीपुत्रावर हल्ला करून तेथून अश्वघोष नावाचा एक बौद्ध भिक्षु तो घेऊन गेला. त्याची राजधानी पूरुषपूर (पेशावर) ही होती. त्याने एक प्रचंड तेरा मजली उंच असा लोखंडी स्तंभ उभारला. त्याची उंची चारशे फूट होती. त्याच्या माथ्यावर एक लोखंडी मेघडंबरी होती. त्याचे शेजारी एक मोठा मठ होता. तो नववे शतकापर्यंत होता. कनिष्काने यार्कद, काशगर, व खोतान हे प्रांत जिंकले.चीनच्या बादशहास तो जी खंडणी देत होता, ती त्याने बंद केली. इतकेच नाही तर दरम्यानच्या राजांस जिंकून