________________
५५ कुशान वंश. इ० स० २० ते २२५. हिऊंगनू नांवाच्या तुर्की फिरस्ती टोळीने त्यांचेच शेजारी चिनाच्या वायव्य प्रांतांत राहणाऱ्या यु-ए ची टोळीचा पराभव केला. तेव्हां यु--एची टोळी पश्चिमेकडे पळून गेली. त्यांची संख्या सुमारे पांच ते दहा लक्ष होती. ते गोवी नांवाच्या रेतीच्या मैदानाच्या उत्तरेस आले. तेथे वू—सन नावाच्या टोळींची व त्यांची गांठ पडली. त्यांच्याशी युद्ध करून त्यांनी त्यांना जिंकले. त्या नंतर जगझार्टिस नदीचे उत्तरेस शक लोक राहात होते तेथे जाऊन त्यांनी त्यांना जिंकले. परंतु वु--सन व हिऊंग-नू हे एकत्र होऊन त्यांनी युएचीला पिटाळून लावले तेव्हां युएची बॅक्ट्यिांत आले. तेथे ते स्थाइक होऊन राहिले. त्यांच्यांत कदफिसीज नांवाचा राजा झाला (इ० स० १५ ). तो देश जिंकीत जिंकीत सिंधुनदीपर्यंत आला. अफगाणिस्थान व सोगडीआना ( बुखारा ) हे प्रांत त्याच्या ताब्यात आले. तो ऐंशी वर्षांचा होऊन मत्य पावला, व त्याचा मुलगा दुसरा कदफिसीज त्याच्या गादीवर बसला. [ इ. स. ४५ ] तोही आपल्या बापासारखा धाडसी व महत्त्वाकांक्षी होता. त्याने पंजाब व भागीरथीतीरचा काशीपर्यंत प्रांत जिंकला. त्याने इ० स० ५५ पासून इ० स० ७८ पावेतों राज्य केले. त्याचे नंतर प्रसिद्ध कनिष्क गादीवर बसला. तो इतका प्रबळ झाला की, १ कनिष्क हा दुसरे कदफिसीजचा दूरचा आप्त असावा. तो कुशान वंशांतील होता एवढेच काय ते खात्रीने सांगतां येते. त्याचे बापाचें नांव वजेष्क किंवा वजेष्य असें होतें.