पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होऊन आपल्यास राजाधिराज म्हणवू लागले. त्यांचे पैकी प्रथमच नांव पुढे आले असें वोनोनीज़ हे होय. शक व पल्हव हे दोघेही आपल्यास राजाधिराज म्हणवून घेत असत. ही पदवी इराणचे राजघराण्यांत क्षाधिआना क्षाथिअ ( क्षत्रियाणां क्षत्रियः ) या रूपाने होती. ती अद्यापि शहान शहा रूपाने आहे. शक क्षत्रपापैकी तक्षशिला येथील क्षत्रप लिअक कुशूलक व मथुरेचा क्षत्रप रंजुबूल यांची नांवें काय ती नाण्यांवरून दिसतात. कापिश येथेही क्षत्रप होता. मोग उर्फ मारुज् राजाचे कारकीर्दीत पाटिक नांवाचा तक्षशिलेस क्षत्रप होता. शकस्तान ( म्ह सिस्तान ) कंदाहार व उत्तर बलुचिस्तान प्रांतावर पल्हव व पश्चिम पंजाब व सिंध प्रांतावर शक राजे राज्य करीत होते. इ०स० चे पहिले शतकांत गोंडो फरीज पल्हव यांचे कारकीर्दीत दोन्ही राज्ये एकत्र झाली. या राजाची कीर्ति युरोप खंडापर्यंत पोहोचली होती. त्याजकडे सेंट टामस नांवाचा पाद्री साधू आला होता. ___ गोंडोफरीजच्या नंतर त्याचे वंशांत बरेच राजे झाले. परंतु त्यांचे राज्याचा विस्तार इ. स. चे पहिले शतकांत पुष्कळ कमी झाला होता. कुशान राजांचा उदय बक्ट्रिया प्रांतांत झाला. ग्रीक, शक, पल्लव व हिंदु हे सर्व त्यांनी आपल्या एकछत्री साम्राज्यांत आणले. इ. स. पू. चे सुमारास काबुल खोऱ्यांतील ग्रीक राजांचा शेवटी राहिलेला प्रांत हरमिअसकडून कुशल कुजुन कदाफसाज याने घेतला. त्याचेनंतर विमकदफिसीस यानें सिंधु नदीजवळील प्रांत घेतला. या वंशाची पूर्ण वाढ कनिष्क राजाचे वेळेस झाली. शालिवाहन शक त्यानेच इ. स. ७८ सालांत स्थापन केला असावा. सौराष्ट्रांतील शक राजांनी त्या शकाचा तीनशे वर्षे उपयोग केला होता म्हणून त्याला शक हे नाव पडले असावे.