________________
७८ साली आपला शक स्थापन केला. पैठणचा शालिवाहन ह्याने हा शक स्थापन केला, अशी जी महाराष्ट्रांत सर्वत्र समजूत आहे, तिला डॉ० भांडारकर किंवा दुसरे कोणी विद्वान संमति देत नाहीत. कनिकाचे काळाबद्दल फार मतभेद आहे. डॉ० फ्लीट इ० स० पूर्वी ५८ म्हणतात. तर डॉ० भांडारकर इ० स०२७८ ठरवितात. प्रो० याफसन व मि० स्मिथ वर लिहिल्याप्रमाणे इ० स० ७८ ठरवितात. पल्लव राजा वोनोनीज याचे वंशज व शक राजा मारुस याचे वंशज हे जवळजवळचे प्रांतांवर राज्य करीत होते. ग्रीक लोकांशिवाय शक व पल्हव नांवाचे परदेशी लोकांनी हिंदुस्थानांवर स्वाऱ्या केल्या व आपली राज्य स्थापिली. शक हे जगझार्टिज नदीचे व बक्ट्रिया व सोगडिआना प्रांताचे उत्तरेकडील प्रदेशांत बरेच दिवस राहात असत. पुढे युएची लोकांनी त्यांना हाकून दिले तेव्हां ते दक्षिणेकडे आले. यांची दुसरी टोळी ड्रांगिआना ऊर्फ शकस्थान ( सिस्तान ) या प्रांतांत राहात होती. युएची लोकांच्या हल्ल्यामुळे ते पार्थिअन लोकांच्या राज्यांतही घुसले. पार्थिआचे राजे, दुसरा फ्राटीज (इ०स०पू० १३८-१२८) व दुसरा आर्टाब्यानस (इ०स० पूर्वी १२८-१२३) यांनी त्यांना हाकून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी दुसरा मिथ्रिडेटीज याने त्यास निखालस हाकून दिले ( १२३-८८) तेव्हां ते शकस्थानांत आले. ____ पल्हव हे पार्थिअन लोकांपैकींच होते. परंतु ते राजकर्त्याच्या कुळांपैकी नसून, द्रागिआना, आराचोशिआ ( कंदाहार ) व गेद्रोशिया ( उत्तर बलुचिस्थान ) ह्या भागांत राहात होते. ते आरंभी कदाचित् पार्थिअन राजांचे क्षत्रप असतील, परंतु पुढे ते स्वतंत्र १विन्सेन्ट स्मिथचा इतिहास पृ. २५६ टीप तिसरी आवृत्ति.