Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होता, त्याचे राज्य कुशान घराण्याचा राजा कुजुल कादफिसीज याने इ० स० चे २६ व्या साली घेतले. ___ ग्रीक लोकांचा अंमल हिंदुस्थानांत असल्याचे त्यांचे नाण्यांवरून शाबीत होते. याशिवाय त्यांचा अंमल असल्याची खण काय ती एकच आहे. ती खूण म्हणजे शिंदेसरकारचे राज्यांतील बेसनगर नांवाचे गांवांत एक पाषाणावरील लेख आहे ही होय. या लेखाचें वर्ष भागभद्र राजाच्या कारकीर्दीचे १४ वें वर्ष आहे. त्यांत आंटिअल्किडस राजाचे नांवाचा उल्लेख आहे. त्यांत विष्णूचा ध्वजस्तंभ उभारण्याकरितां देणगी दिल्याचे लिहिले आहे. त्यांत विशेष गोष्ट ही आहे की, ही देणगी देणार आंटिअल्किडस राजाचा वकील डायनचा मुलगा हेलिओडोरस नांवाचा ग्रीक मनुष्य आहे. पुराणांतील पुष्पमित्र शंगचा वंशज भद्र ऊर्फ भद्रक व हा भागभद्र एकच असावा. ___पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी एका महत्त्वाच्या लेखाचा शोध लावला आहे. त्यावरून मथुरेच्या क्षत्रपांचे घराण्यांतील लोकांची व उत्तर हिंदुस्थानांतील दुसरे क्षत्रपांचीही नांवें मिळतात. हे व कपिश व तक्षशिला येथील क्षत्रप बौद्ध धर्माचे असल्याचे दिसून येते. हा लेख खरोष्टी लिपीत असून तांबड्या दगडाचे सिहासनावर खोदला आहे. यावरून शक लोकांनी त्या प्रांतांतील ग्रांक व हिंदु राजांचा पराभव करून आपला अंमल स्थापन केल्याचे सिद्ध होते. . कालिकाचार्यकथा नांवाच्या जैन ग्रंथांतही मध्य हिंदुस्थानांत शक अंमल असल्याचे लिहिले आहे. त्यांत असेंही लिहिले आहे की, उज्जनीचा राजा विक्रमादित्य याने शक लोकांचा पराभव केला, व इ० स० पूर्वी ५८ वे वर्षां विक्रम संवत स्थापन केला. हा शक १३५ वर्षे चालून पुढे एका शक राजानें इ० स० नं०