Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाठविले. त्याने पश्चिम पंजाब, काबूल व सिंध खोऱ्यांचे प्रांत जिंकले. याप्रमाणे तो बाहेर जय मिळवीत चालला असता, त्याचे स्वतःचे राज्यांतच त्याला युक्रेटायडीज नांवाचा बलाढ्य शत्रु उत्पन्न झाला. त्याने बक्ट्रिया प्रांत जिंकला, इतकेच नव्हे तर डिमिट्रिअसने हिंदुस्थानांत जिंकलेला भागही शेवटी घेतला. यापुढे युथिडेमस व युक्रेटायडीज या दोघांचेही वंशज हिंदुस्थानांतील काही भागांवर राज्य करीत होते. युथिडेमसचे वंशजांचे राज्य इ० स० पूर्वी १०० व युक्रेटायडीजचे राज्य इ० स० पूर्वी२५वर्षेपावेतों टिकलें पार्थियाचा राजा मिथ्रिडेटीस व युक्रेटायडीज हे समकालीन होते( इ० स० पू० १७१). या सालानंतर युथिडेमसचे वंशजांचा अंमल बॅक्ट्रियांत राहिला नाही. त्यांचे राज्य काय तें हिंदस्थानांतच राहिले. हिंदम्थानांतील डिमिट्रिअमने मिळविलेलेल्या प्रातांत त्यांचे वंशज आपालोडोटस व मिनँडर यांनी बरीच भर घातली. मिनॅडरचे कांहीं नाण्यांवरून असे दिसते की, तो “ हीडास्पीज ( बिया ) नदीचे अलीकडे आला होता, इतकेच नाही तर, इ. सनाचे ८० सालांत त्यांची नाणी बरुकच्छ ( भडोच ) येथे चालत होती. बुद्धग्रंथ मिलिंदपन्हा यांत जो मिलिंद राजा लिहिला आहे तो हा मिनॅडरच होता. मिलिंद राजा शाकल ( सिआलकोट ) येथे रहात होता. युथिडेमसच्या वंशजांचा शक लोकांनी पराभव केल्यानंतर, त्यांनी मथुरेत जी नाणी सुरू केली ती त्या वंशजांच्या सारखीच होती. यावरून त्या वंशजांची एक राजधानी मथुरा असावी, असे अनुमान निघते. त्यांचे राज्य बरेंच विस्तत असल्याचे कालिदासाचे मालविकाग्निमित्रांत, पतंजलीचे महाभाष्यांत व गर्गसंहितेत जे यवनांचे उल्लेख आहेत, त्यावरूनही सिद्ध होते. ग्रीक जातीचा हिंदुस्थानातील शेवटचा राजा हर्मियस नांवाचा