पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० पार्थिया प्रांतांत. त्यांचा परिणाम हिंदुस्थानापर्यंत येऊन पोहोचला. इ० स० पूर्वी २५० साली, बॅक्ट्रिया ( सांप्रतचे बाल्ख ) चा क्षत्रप डिओडोटस् व पार्थियांतील एक धाडसी वीर आरसेकीन यांनी सेल्यूकसचे वंशजांचा अंमल झुगारून दिला; व त्यांनी वेगवेगळी स्वतंत्र राज्य स्थापन केली. ___बैक्ट्रिया प्रांत अफगाणिस्थानचे व आक्सस नदीचे उत्तरेस आहे. त्याचे व मौर्य साम्राज्याचे सरहद्दीवर हिंदुकुश पर्वत होता. बँक्ट्रियाचे राज्य डिओडोटसने स्थापन केले, ते इ. स. पू. १३५ वर्षेपावेतों टिकले. त्या सुमारास शक लोकांचे स्वारीने तें नाहींसें झालें. पार्थियनांचे राज्य इ. स. नंतर २२६ वर्षपावेतों चाललें. त्यांचे राजांपैकी मिथ्रिडेटीसचे राज्य सिंधूनदीपर्यंत वाढले होते. सिरयाचे राजांनी हे दोन प्रांत केवळ मुकाट्याने जाऊं दिले असें नाहीं. इ. स. पू. २०९ सालांत पार्थिया प्रांत आर्टेबेनसचे व बक्ट्रिया प्रांत युथिडेमसचे ताव्यांत असतांना सिरियाचा राजा आंटिओकस याने त्या दोघांवर स्वारी केली. परंतु त्यांत त्याला म्हणण्यासारखा जय आला नाही. शेवटी ते दोन्ही प्रांत स्वतंत्र झाले व आंटिओकसला त्यांचे स्वातंत्र्य कबूल करावे लागले. ___ यानंतर आंटिओसकनें काबूल प्रांतावर स्वारी केली. अशोकाच वेळी हा प्रांत त्याचे साम्राज्यापैकी होता. परतु पुढ ता स्वतंत्र झाला होता. आंटिओकसचे स्वारीचे वेळेस तेथील राजा सुभागसेन नांवाचा होता. त्याने आंटिओकसला खंडणी देण्याचे कबूल केले. आंटिओकसच्या स्वारीनंतर बॅक्ट्रियाचा राजा युथिडेमस यानेही हिंदुकुश पर्वताचे दक्षिण प्रांतांवर स्वारी करण्याचे मनांत आणले. त्याने डिमिट्रिअस नांवाचे आपले मुलास फौज देऊन तिकडे न झाला होता त्याच साम्राज्यावर स्वारी केली.