________________
त्याच सुमारास कुशान राजापैकी शेवटचा वासुदेव नांवाचा राजा मयत झाला, व इराणांतील सस्सनीय वंशाचा उदय झाला. इ० स० चे तिप्तरे शतकाचे हिंदुस्थानचे इतिहासाची माहिती बरोबर मिळत नाही. भाग ७ हिंदी ग्रीक व हिंदी पार्थियन वंश ग्रीक, शक, व पल्हव लोकांच्या हिंदुस्थानावर स्वाय. (इ०९ स० पू० २५० ते इ० स० ६० ) चवथे भागांत सांगितल्याप्रमाणे नि. पू. ३०५ वर्षांचे सुमारास चंद्रगुप्ताने सेल्यूकसचा पराभव केला. त्यानंतर वायव्य सरहद्दीवरील हिंदुकुश पर्वतापर्यंतचे प्रांत चंद्रगुप्त मौर्य व त्याचे वंशज यांच्या ताब्यांत अशोक राजाच्या मरणापावेतों राहिले. त्याच्या मरणानंतर ते प्रांत स्वतंत्र होऊ लागले. अशोक राजाचे कारकर्दीितच सिरियाचे साम्राज्यांत बहुतेक एकाच काळी दोन मोठी बंडे झाली; एक बैक्ट्रिया प्रांतांत व दुसरे १ मि. के. पी. जयस्वाल यांचे म्हणणे असे आहे की, शातकर्णी राजा इ. स. पूर्वी १३२ साली राज्यारूढ झाला, व तो इ० स० पूर्वी ५८-५७ सालांत मरण पावला, तेव्हां त्याचे गादीवर त्याचा मुलगा पुलुमायी बसला. यालाच पुलोमा व विलोमा अशीं नांवें आहेत, व तोच विक्रम संवताचा कर्ता विक्रमादित्य होय; व त्यानेच नहपानाचा पराभव केला. ( मॉडर्न रिव्हू; डिसेंबर १९१३ पान ६२३). २ हा भाग मुख्यत्वेकरून प्रो. याफ्सन यांचे ग्रंथाचे आधाराने लिहिला आहे.