________________
एक ग्रंथ प्राचीन महाराष्ट्र भाषेत लिहिला आहे. त्यासच शालिवाहन किंवा शातवाहन असें म्हणतात. राजा गौतमीपुत्र श्री शातकर्णी व राजा वासिष्ठीपुत्र श्रीपुलुमायी यांच्या कारकीर्दीत आंध्रांची, पश्चिम किनाऱ्यावर स्थाडक. झालेले परदेशस्थ क्षत्रप राने त्यांच्याशी युद्धे झाली. या क्षत्रपांपैकी क्षत्रप भूमकक्षहरात यांचे नांव राहिले आहे. तो इ० सनाचे पहिले शतकांत झाला असावा, व पार्थियन राजांचा मांडलिक असावा. त्यानंतर दुसरे नांव नहपान याचे दृष्टीस पडते. त्याचे साल इ० स० ६० व ९० यांचे दरम्यान असावें. तो प्रथम क्षत्रप होता. पुढे त्याने महाक्षत्रप असें नांव धारण केले. त्याचे राज्याचा विस्तार दक्षिण राजपुतान्यापासून पुणे व नाशिक जिल्ह्यापर्यंत होता. व त्यांत काठेवाड (सुराष्ट) प्रांताचा समावेश होत होता. तो कुशान राजाचा मांडलिक असावा. राजा गौतमीपुत्र इ० स० १०२ सालांत गादीवर आला. इ० स० १२४ सालांत त्याने शहरात वंशाचा पराभव करून त्याचे राज्य घेतलें, व हिंदुधर्म स्थापन केल्याबद्दल त्यास अभिमान वाटला. त्याचा मुलगा वसिष्ठीपुत्र श्रीपुलमायी याने उजनीचा क्षत्रप रुद्रदामा याचे मुलीशी लग्न केले. परंतु पुढे जावई व सासयाचे युद्ध झाले. त्यांत सासऱ्याचा जय झाला व क्षहराताचा जिंकलेला प्रांत रुद्रदामाने परत घेतला. (इ० स० १५० ). रुद्रदामा हा क्षत्रप चष्टन याचा नातू होता. इ० स० १६३ सालात वाशिष्ठीपुत्र पुलुमायांचे मरणानंतर, गौतमीपुत्र यज्ञश्री याचे नांव ऐकं येते. त्याने २९ वर्षे राज्य केले. (इ० स० १७३-२०२). त्याने रुद्रदामाचे वेळेस गेलेले प्रांतांपैकी काही प्रांत परत घेतलेसें दिसते. या वंशांतील शेवटचे तीन राजे विजय, चंद्रश्री, व चवथा पुलुमायी हे होत. इ० स० २२५ सालांत हा वंश समाप्त झाला.