पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ काण्व वंश. देवभूतीचा ब्राह्मण प्रधान वसुदेव याचे अंग देवभूतीचा वध करण्यांत होते. वसुदेवानें गादी बळकाविली. त्याच्या वंशांत त्याच्या मागून तीन राजे झाले. त्यापैकी शेवटच्या राजांस आंध्र ऊर्फ शातवाहन राजाने ठार मारले, व त्याचा वंश ख्रि. पू. २८ सालांत संपला. आंध्र वंश. आंध्र हे द्रविडी लोक होते. त्यांचे राज्य कृष्णा व गोदावरी ह्या नद्यांचे मुखांजवळ हिंदुस्थानचे पूर्व किनाऱ्यावर होते. त्यांचा पहिला राजा शिशुक ऊर्फ सिमुक हा होता. चंद्रगुप्त मौर्याचे वेळेस त्याच्या राज्यांत तीस तटबंदीची शहरें होती. त्याची फौज एक लक्ष पायदळ, दोन हजार घोडेस्वार, व एक हजार हत्ती याप्रमाणे होती. त्यांची राजधानी कृष्णातीरीं श्रीकाकुलं नांवाचें नगर होते. (इ० स० पूर्वी ३००). ते अशोकाचे मांडलिक म्हणून गणले जात असत (इ०स०पू०२२६); परंतु अशोक राजाच्या मृत्युनंतर ते पूर्णपणे स्वतंत्र झाले. व त्यांचा दुसरा राजा कृष्ण याने आपले राज्य नाशिकापर्यंत वाढविलें. पढ़ें इ. स० पूर्वी २८ सालापावेतो त्यांचे नांव विशेष ऐकण्यांत येत नाही. त्या साली वर लिहिल्याप्रमाण त्यांच्यापैकी एका राजाने काण्व वंशांतील सुशर्मा नांवाच्या शेवटल्या राजाला मारून त्याचे राज्य काबीज केले. परंतु मारणाराच्या नांवाबद्दल शंका आहे. त्यानंतर हाल नांवाचा राजा गादीवर आला. त्याने सप्तशती नांवाचा १ महाराष्ट्र प्रांताचा इतिहास भाग १२ अंक पहा.