पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___ या वेळेस नर्मदेकडील प्रांतावर पुष्पमित्राचा मुलगा अग्निमित्र हा प्रतिनिधीच्या कामावर होता. राजधानी विदिशा (हल्लीचें भेलसें शहर, ) येथे होती. त्याने विदर्भ देशाच्या राजाशी युद्ध करून त्याचा पराभव केला. पुष्पमित्राच्या मनांत अश्वमेध यज्ञ करावयाचे आल्यावरून, त्याने अग्निमित्राचा मुलगा वसुमित्र यास पोक्त सैन्य बरोबर देऊन अश्व सोडला. अश्वाला यवन लोकांनी सिंधु नदीच्या तीरावर प्रतिबंध केल्यामुळे, वसुमित्राने त्यांचा पराभव करून अश्व सोडवून आणला. कालिदासाचे मालविकाग्निमित्र नाटकांत पुप्पमित्राने अग्निमित्राला आपल्या कुटंबासह यज्ञास येण्याबद्दल आमंत्रण केल्याचे व वसुमित्राने शौर्याने यवनांचा पराभव केल्याचे सुंदर वर्णन दिले आहे. पतंजलीच्या ग्रंथांतही ह्या अश्वमेधाचा उल्लेख आहे. त्याने हा यज्ञ समक्ष पाहिला असावा असे दिसते. यावरून त्यावेळी बौद्ध धर्माचे प्राबल्य कमी होऊन ब्राह्मण धर्माचे पुनरुज्जीवन झाल्याचे स्पष्ट दिसते. बौद्ध व जैन धर्माच्या लोकांचा पुष्पमित्राने छळ केल्याचा स्पष्ट पुरावा नाही. पुष्पमित्र खिम्ती स०पूर्वी १४८ व्या वर्षी मरण पावला. त्याच्या नंतर अग्निमित्र वगैरे सुमारे नऊ राजे झाले. परंतु त्यांच्या कारकीर्दीत म्हणण्यासारखी काही विशेष गोष्ट घडून आली नाही. शेवटचा म्हणज दहावा राजा देवभूति हा विषयासक्त होता, व त्यांतच त्याचा अंत झाला. (इ० स० पूर्वी ८२). १ ह्याला पुष्य मित्र ही म्हणतात २ हे यवन मेाडरच्या सैन्यापैकी असावेत. ३ मालविकाग्निमित्र अक ५