Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिलोन, सीरीया, इजिप्त, सायरिनी, मॅसिडोनिया व इपायरस ह्या प्रांतांत त्याने उपदेशक पाठविले. बौद्ध धर्माचे उपदेशाचे क्षेत्रांत तिबेटांतील कांबोज लोक, हिमालयांत राहणारे दुसरे लोक, काबुलाजवळील गंधार व यवन लोक, विंध्याद्रींत व पूर्व किनाऱ्यावरील पर्वतांत राहणारे भोज, पुलिंद वगैरे लोक, तसेच कृष्णा व गोदावरी नद्यांचे दरम्यानचे आंध्र लोक यांचा समावेश झाला. पुष्कळ दूरदरच्या ठिकाणी त्याने मठ बांधिले. त्याचा धाकटा भाऊ महेंद्र याने तंजावर प्रांतांत जो मठ बांधला त्याच्या खुणा पुढे नऊशे वर्षांनी दिसल्या, असें बीलचे म्हणणे आहे. पुढे ह्याच महेंद्राला आणखी चार शिष्य बरोबर देऊन राजाने सीलोनला पाठविले. तेथील राजा टिसा याने व त्याच्या दरवारच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, व लवकरच त्या धर्माचा प्रसार इतर लोकांत झाला. महेंद्र मरेपावेतो तेथेच राहिला. तेथे त्याची साधु ह्मणून प्रसिद्धि झाली व त्याच्या शरीराची रक्षा मिहिंतले येथील स्तूपांत ठेविली आहे. गौतम बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली खरी, परंतु त्याच्या वेळेस त्याचा प्रसार संकुचित प्रदेशांत मात्र झाला. त्याची मर्यादा गया, प्रयाग व हिमालयपर्यंत एथपर्यंत होती. त्याचा चोहीकडे प्रसार अशोकाने केला, व त्याच्या वेळेपासून तो धर्म जगताच्या बऱ्याच मोठ्या भागाचा धर्म झाला, ज्या काही थोड्या महात्म्यांच्या कृतीचा परिणाम, जगताच्या रहाटीला वेगळे वळण लावण्याइतका झाला त्या महात्म्यांच्या कोटींत अशोकाची गणना केली पाहिजे. अशोकाइतका काम करणारा राजा क्वचितच आढळेल. तरी तो नेहमी ह्मणे की, माझ्या हातून व्हावे तितकें काम होत नाही,