Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तंत्र व कर्म ही जरी उपयोगी असली तरी दासांस व हाताखालच्या लोकांस मायेने वागविणे, गुरुजनांस मान देणे, अतिथि–अभ्यागतास भिक्षा घालणे व भूतमात्रावर दया करणे हे ज्यास्त श्रेयस्कर आहे, असे नवव्या शासनांत जाहीर केले आहे. ___ ह्या सर्व शासनांची अंमलबजावणी करण्याकरितां खास अधिकारी नेमले होते, व इतर अधिकाऱ्यांना सुद्धा लोकांच्या सभा करून ह्या आज्ञांची समज देण्याकरितां हुकूम होते. अशोकानंतर राजा हर्षकुमालपाल व काश्मीरचे राजे हे ह्या आज्ञा अमलांत आणण्याकरितां यत्न करीत होते, असें बील व बुल्हर ह्यांच्या लेखांवरून समजतें. - बारावे शतकांत गुजराथ प्रातांचा राजा कुमारपाळ याचाही अहिंसेसंबंधाने फार कटाक्ष होता. एका प्रसंगी एक उंदीर मारल्यावरून एका व्यापाऱ्यास अन्हिलवाडा येथील न्यायसभेपुढे आणिलें, तेव्हां त्याची सर्व मिळकत जप्त केली व तिचे उत्पन्नांतून एक देऊळ बांधले. दुसरे प्रसंगी एका मनुष्याने शहरांत कच्चे मांस खाण्याकरितां आणले त्यास तर देहांतशिक्षा झाली. ___ अशोकाचे दानधर्माचे एक स्वतंत्र खातें होतें. सातव्या स्तंभावरील लेखांत अशोकानें खालीलप्रमाणे लिहिले आहे: " मनुष्याला व जनावराला छाया मिळण्याकरितां वडाची झाडे लावली आहेत; आंब्याच्या राया लावल्या आहेत; प्रत्येक अर्ध कोशावर विहिरी खोदल्या आहेत; धर्मशाळा बांधल्या आहेत; व मनुष्यांच्या आणि जनावरांच्या सुखाकरितां मधून मधून तलाव व पाट केले आहेत." ___ मनष्याकरितां व जनावरांकारतां ठिकठिकाणी औषधालये पांजरपोळ बांधले होते. . लोकांना धर्माचा उपदेश करण्याकरितां, दक्षिण हिंदुस्थान