Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याबद्दल मला फार वाईट वाटते. जगताच्या कल्याणाकरितां मला काम केलेच पाहिजे असें तो नेहमी म्हणत असे. त्याचा मुख्य गुण म्हणजे त्याची खरी निष्ठा. हिंदुस्थान देश नीतिमान कसा होईल या गोष्टीकडे त्याचे मुख्य लक्ष होते. त्याचे मुख्य ध्येय हेच होते. परंतु त्याचे म्हणणे असे होते की, राजा मार्ग दाखवू शकेल, पण मोक्ष मिळविणे हे प्रत्येक व्यक्तीचे काम आहे. रूपनाथ येथील आझेंत तो म्हणतो “ लहानांनी व मोठ्यांनी मेहनत केली पाहिजे. फळ मोठ्यांनाच मिळते असे नाही. लहान मनुष्य कर्म करील तर त्यासही मोक्ष मिळेल." ह्याप्रमाणे अशोकराजा केवळ हिंदुस्थानांतीलच नव्हे, तर सर्व पृथ्वीवरील पुण्यश्लोक राजांपैकी राजा होऊन गेला, असे म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. ___अशोकाला दोन बायका होत्या. पैकी चारुवाकी नांवाच्या स्त्रीला तीवर नांवाचा पुत्र होता. परंतु तो अशोकाच्या पूर्वीच मरण पावला असावा. अशोकानंतर त्याचा नातु दशरथ हा त्याच्या गादीवर बसला (ख्रि. पू. २३१ ) अशोकाची मुले व नातू यांच्यासंबंधाने नानाप्रकारच्या आख्यायिका आहेत. त्याची बहुत विश्वासक अशी राणी असंधिमित्रा नांवाची होती. तिचे मरणानंतर अशोकाने एका तरुण व स्वैर वर्तनाच्या स्त्रीशी लग्न केले. तिचे नांव तिप्यरक्षिता असे होते; कुनाल नांवाचा त्याचा मुलगा होता; व संप्रति व दशरथ नांवांचे नातू होते, अशाही आख्यायिका आहेत. परंतु यासंबंधाने खात्रीलायक असें कांहींच सांगतां येत नाही. ____ मौर्य साम्राज्याची समाप्ति ख्रि. पू. १८४ साली झाली. बृहद्रथ नांवाच्या शेवटच्या राजाचा वध त्याचा सेनापति पुष्पमित्र यांनी केला. अशोकाचे वंशज सातव्या शतकापर्यंत मगध देशाचे