पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तीन आज्ञा प्रसिद्ध केल्या आहेत. हिंदी आर्यांच्या धर्मात पुनर्जन्माचे तत्व फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्या कारणाने किडामुंगीच्या जिवास सुद्धा त्यांच्या दृष्टीने महत्त्व आहे. कालांतराने ह्या किडे मुंग्या मनुष्य अथवा देव होऊ शकतील व उलट देव अथवा मनुष्य आपल्या कर्माप्रमाणे किड्यामुंग्यांच्या जन्मास येईल. ह्या तत्वाचा एक विपरित परिणाम कधी कधी असा होई की,इतर प्राण्यांचा प्राण घेण्याबद्दल किंवा मांसभक्षणाबद्दल मनुष्यास देहान्त शिक्षा देण्यांत येई. अशोकाने या शिक्षेत एवढाच बदल केला की, मरणापूर्वी गुन्हेगारांस पश्चात्ताप व प्रार्थना करण्याकरितां तीन दिवसांची मुदत त्याने दिली. . पूर्ववयांत अशोक शिवभक्त होता. त्या वेळेस राजवाड्यांतील लोकांकरितां हजारों प्राण्यांचा दररोज वध होत असे. पुढे त्याच्यावर बौद्धमतांचा परिणाम ज्यास्त झाला, तेव्हां फक्त दोन मोर व हरिण एवढे मात्र मारण्यांत येत असत. शेवटी २५७ साली हाही वध बंद झाला, असें रा. देवदत्त भांडारकर यांच्या लिहि'ण्यावरून समजतें, पूर्वीच्या राजांचा जो शिकारीचा एक मोठा समारंभ होत असे तोही अशोकानें नि०पू० २५९ वे वर्षों बंद केला. २४३ सालीं पशुवधाच्या संबंधाने त्याने सक्त नियम केले. वर्षातून ठरलेल्या ५६ दिवसांत पशुवध अजिबात बंद केला. बाकीच्या दिवशी ज्या लोकांना खाण्याकरितां मांसाची जरूरी आहे अशा लोकांना पशुवध करण्याची परवानगी ठेवली. परंतु त्यासंबंधाने कांहीं कडक नियम ठेवण्यांत आले होते. परधर्माविषयीं दरएक मनुप्याने सहानुभूतीचे वर्तन ठेवावें अशाबद्दल बाराव्या शासनांत जाहीर केले होते. दान धर्म करणे हे पुण्याचे काम आहे, परंतु सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे धर्मदीक्षा हे आहे, अशी अकराव्या शासनांत राजाज्ञा आहे.