पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मध्य हिंदुस्थानांतील साची येथील स्तूप मात्र कायम आहेत. पांचव्या शतकांत चिनी प्रवाशी फाहिएन पाटलिपुत्रास आला, तेव्हां अशोक राजाचा वाडा कायम होता, व त्याला तो इतका अलौकिक वाटला की, तो बांधण्यास राजाने यक्षादिक अमानुष पुरुषांची योजना केली असावी, असे तो म्हणाला. अशोकाने एका शिलेचे उभारलेले स्तंभांपैकी काही ५० फूट उंच असून एकेकाचे वजन ५० टन आहे. अशोकाचे खोदीव लेख हिमालयापासून म्हैसुरापर्यत व बंगालच्या उपसागरापासन आरबी समुद्रापर्यंत आहेत. ते पाली भाषेत लिहिले आहेत व रहदारीच्या तीर्थ यात्रेच्या रस्त्यांवर ठविलेले आहेत. ह्यावरून त्याचा हेत ते लेख सर्वांनी वाचावे असा होता है सिद्ध होते. दोन लेखांशिवाय सर्व लेखांची लिपि ब्राह्मणी आह. वायव्य सरहद्दीवरील दोन लेखांची लिपी मात्र खरोष्टी आहे. आपल्या प्रजेची नैतिक उन्नति करणे हे राजाच मुख्य काय जाह, ह्या तत्वाचे अवलंबन अशोकराजाइतकें, पथ्वीवरील कलियुगातील राजांपैकी, फारच थोड्यांनी केले असेल. त्याने आपल्या प्रजाजनांमध्ये मुख्यत्वेकरून तीन तत्त्वांचा प्रसार करण्याचा मनापासून प्रयत्न केला. ही तीन तत्त्वें म्हणजे ( १ ) प्राणि मा. सापर दया करणे, (२) वाडवडिलांचा व गरुजनांचा मान राखणे, (२) सत्याचार ही होत. त्याच्या बहतेक शिलालेखांत ह्या १ हिंदुस्थानांतील प्राचीन शिलालेख विद्वान संशोधकांचे दृष्टीस प्रथम पडले, तेव्हा त्या लेखांच्या दोन लिपी होत्या असें नजरेस आले. एक ब्राह्मी व दुसरी खरोष्टी. ब्राह्मी बहधा डावीकडून उजवीकडे लिहिलेली असे. खरोष्टी उजवीकड़न डावीकडे लिहिलेली असे. खरोष्टी लिपी अफगाणिस्तान व पंजाब या प्रांतांत प्रचलित असे. दोन्ही लिपी फिनीशियन त-हेच्या मूळच्या असाव्यात. खरोष्टी हिंदुस्थानांतून इ०स०चे तिसऱ्या शतकांत नाहीशी झाली. (रपसन्स एनशन्ट इंडिया; पृष्ठ १७ व १८)