पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९ आला. या ठिकाणी बुद्धास आत्मसाक्षात्कार झाला होता. शेवटी नेपाळांतील कुशी नगरास आला. तेथे बुद्धाच्या अवताराची समाप्ति झाली. २४२ व्या वर्षी अशोकाने आपले सर्व कायदे एकत्र केले. व प्राण्यांची हिंसा बंद करण्याचे सक्त निबंध प्रसिद्ध केले. पुढे दोन वर्षांनी अशोकराजाने संन्यासाची वस्त्र धारण केली व त्याने जरी राज्य सोडलें नाहीं, तथापि राज्यकारभार आपले प्रधान व युवराज यांचे हाती दिला. पुढे तो मगध देशाची प्राचीन राजधानी राजगृह येथे २३२ किंवा २३१ व्या साली मृत्यू पावला. आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या दहा सालांत केव्हां तरी पाटलिपुत्र येथे बौद्ध धर्माची परिषद त्याने भरविली असावी. _____ अशोकाचे राज्य वायव्येस हिंदुकुश पर्वतापर्यंत होते व त्यांत अफगाणिस्थान, बलुचिस्थान, व सिंध यांचा समावेश होत होता. काश्मीर प्रांतांत त्याने श्रीनगर नांवाची नवी राजधानी स्थापन केली. नेपाळांत जुनी राजधानी मंजुपत्तन नावाची होती, ती बदलून ललिपतन अथवा ललितपुर नांवाची नवी राजधानी स्थापन केली. तें गांव अद्याप आहे. तो नेपाळांत तीर्थयात्रेस गेला होता. तेव्हां त्याच्या बरोबर त्याची मुलगी चारुमति ही होती. अशोक राजा परत आला तेव्हां ती तेथेच राहिली. तिने आपला नवरा देवपाळ क्षत्रिय ह्याचे स्मारक म्हणून देवगण शहर स्थापन केले. व ती स्वतः पशुपतिनाथाच्या उत्तरेस एक मठ बांधून जोगणि होऊन राहिली. त्या मठास तिचे नांव अद्याप चालत आहे. पूर्वेस त्याच्या राज्यांत बंगाल व कलिंग प्रांतांचा समावेश होत होता. आग्नेयी दिशेस पेनार नदीपर्यंत त्याच्या राज्याचा विस्तार होता. दक्षिणेस चोल व पाण्डय यांचे राज्यांपर्यंत अशाकाचे राज्याचा विस्तार होता. अशोक राजाचे लक्ष इमारती बांधण्याकडे फार होते. त्याने पुष्कळ भव्य मठ बांधले व शिवाय पुष्कळ स्तूप बांधले. त्यांपैकी