पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ शासने प्रसिद्ध केली. त्यांत त्याने आपले राज्य कोणत्या तत्त्वावर चालवावयाचे हे जाहीर केलें. कलिंग प्रांत जिंकला त्या वेळी, त्या प्रांताचें राज्य चालविण्याची तत्त्वे, दोन शिलालेखांवर खोदून जाहीर केली. गया क्षेत्राजवळील बरावर टेकडीवरील दोन तीन गुहांमध्ये लेख आहेत. त्यांत त्या गुहांतील घरे आजीविक नांवाच्या साधु लोकांस दिल्याचे लिहिले आहे. तराई येथे मोठमोठ्या दोन स्तंभांवर लेख आहेत. त्यांत अशोकाच्या यात्रेचे वर्णन दिले आहे. याशिवाय आणखी पुष्कळ स्तंभांवर लेख आहेत. दुसरे लहान लहान शिलालेख आहेत. त्यापैकी एकावरून गौतम बुद्धाच्या मृत्यूचे साल ख्रि. पूर्वी ४ ८७ असल्याचे नक्की होते. रजपुतस्थानाच्या पर्वतांतील अगदी एका बाजस असलेल्या एका मठांतील लेखांत अशोक राजा असे जाहीर करतो की, धर्माचरणाच्या ज्या आज्ञा मी प्रसिद्ध केल्या जाहत त्या पाळणे हे गृहस्थ, भिक्षक, यति, परुष व स्त्रिया या सवाच कतव्य आहेच. परंतु प्रभु बुद्धाच्या आज्ञा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. स्त्रि. पू. २४९ व्या वर्षी अशोक तीर्थयात्रेस निघाला. पाटलिपत्राहून उत्तर दिशेस हिमालय पर्वताच्या पायथ्याजवळ तो आला. त्याचा हा मार्ग त्याने स्थापन केलेल्या एका प्रचंड पाषाणाचे सांभाववरून निश्चित होतो. तेथून तो पश्चिम दिशेस वळला, व बुद्धाचें जन्मस्थान में लंबिनी उद्यान तेथें तो आला. तें स्थान त्याला त्याचा गुरु उपगुप्त ह्याने दाखविले. तेथे अशोकानें एक स्तंभ स्थापन केला. त्यावरील लेख अद्याप पावेतों स्पष्ट वाचण्यासारखा आहे. तेथून तो बुद्धाचे बाळपणाचे स्थान में कपिलवस्तु तेथे गेला. तेथून काशीजवळ सारनाथ गांवास गेला. तेथे बुद्धाने आपल्या उपदेशास आरंभ केला. पुढे जेथे बुद्ध फार दिवस राहिला होता त्या श्रावस्ती नगरी तो आला; तेथून गयेंतील बोधिवृक्षाच्या दर्शनास