पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निकराची झाली की, त्यांत एक लक्ष लोक प्राणास मुकले, दीड लक्ष लोक कैदी केले व लक्षावधि लढाईपासून उद्भवणारे साथीचे रोग, उपासमार वगैरे कारणांनी मृत्युमुखी पडले. ह्या लढाईत दृष्टीस पडलेल्या हालअपेष्टांमुळे, अशोक राजास फार वाईट वाटलें. ही सर्व दैना होण्यास मी कारण आहे, ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागून राहिली. तेव्हांपासून लढाई करून मानव प्राण्यांवर असा दुःखाचा प्रसंग पुनः कधींहि न आणण्याचा त्याने निश्चय केला. ह्या लढाईनंतर चार वर्षांनी त्याने में राजशासन प्रसिद्ध केले त्यांत असे लिहिले आहे की, या लढाईत जितके लोक मारले गेले त्यांच्या शतांश किंवा सहस्रांश जरी प्राणहानि होईल तरी सद्धां आमांस फार वाईट वाटेल. याच सुमाराला अशोक राजाचे मन बौद्ध धर्माकडे वळू लागले, व दिवसेंदिवस बौद्ध मतांचा परिणाम मनावर अधिकाधिक दृढ होत चालला. त्याच्या तेराव्या शिलालेखांत असे लिहिले आहे की, लढाई करून राज्य वाढवावें हैं राजाचे कर्तव्य आहे, ही समजूत माझ्या वंशजांनी आपल्या मनांतून समूळ काढून टाकावी. मुख्य विजय म्हणजे धर्माने आचरण करणे हा होय. ह्या वेळेपासून अशोकानें आपल्या प्रचंड राज्यांत धर्माचरणाचा प्रसार करण्याचा निश्चय केला. आपल्या अमर्यादित अधिकाराचा सर्व उपयोग तो एका गोष्टीकडे करूं लागला. त्याने आपल्या राज्याच्या १६ व्या व १७ व्या वर्षी आपल्या राज्यांत मोठमोठ्या चौदा शिलांवर राज १ फ्लुटार्कने टेजन बादशहास में पत्र लिहिले आहे त्यांत त्याने याचप्रमाणे उपदेश केला आहे. तो म्हणतो, " राज्याचा आरंभ आपल्या हृदयापासून केला पाहिजे. प्रथम आपल्या मनोवृत्तीवर जय मिळविला पाहिजे. आपण आपल्या आचरणाचे अंतिम ध्येय सदाचार हे ठेवाल तर बाकीचे सर्व व्यवस्थेनें चालेल."