Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ वा. झाला होता. व कर्तबगारीवरून राज केले होते. अशोकवर्धन ऊर्फ अशोक. बिंदुसार खि. पू. २७२ वे वर्षों मरण पावला व त्याचा मुलगा अशोक हा त्याच्या गादीवर आला. परंतु राज्यारोहण विधि पुढे तीन वर्षांनी झाला. बिंदुसाराच्या हयातीत अशोक हा वायव्य प्रांताचा प्रतिनिधि होता. त्यानंतर पुढे बिंदुसाराच्या मरणापूर्वी तो काही दिवस पश्चिम हिंदुस्थानचा प्रतिनिधि झाला होता. त्याच्या लायकीवरून व कर्तबगारीवरून बिंदुसाराने त्यास युवराज केले होते. वायव्य प्रांताची राजधानी तक्षशिला होती. हे शहर सांप्रतच्या हसन अबदाल व रावळपिंडी ह्या दोन शहरांच्या जवळ होते. मध्य एशियांतून हिंदुस्थानांत शिरण्याचा जो राजरस्ता आहे त्याच्या तोंडाशीच असल्याकारणाने ते फार महत्त्वाचे ठाणे होते. परंतु त्याचे विशेष महत्त्व हे होते की, तें विद्या शिकण्याचे एक प्रसिद्ध पीठ होते. राजेरजवाडे, ब्राह्मण व वैश्य यांची मुले अभ्यासाकरितां तेथे येत असत. त्याच्या आसपासचा प्रांत सुपीक व भरभराटीच्या स्थितीत होता. त्याप्रमाणे पश्चिम हिंदुस्थानची राजधानी, उज्जनी, हेही शहर विचेविषयीं नामांकित होते. अशोक राजाला याप्रमाणे विद्या शिकण्याची अपूर्व साधने मिळाली होती. त्याच्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत फक्त एकच लढाई झाली. ती २६ १ या सालांत कलिंग देशाच्या राजाशी झाली. हा कलिंग देश बंगालच्या किनाऱ्यावर महानदीपासून गोदावरी नदीपर्यंत होता. त्या राजाजवळ साठ हजार पायदळ, एक हजार घोडेस्वार व सातशे लढाऊ हत्ती इतकें सैन्य होतें. लढाई इतका