Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कथा आहे की, चंद्रगुप्त मौर्य हा जैन होता व त्याचे कारकीदीत जेव्हां बारा वर्षांचा दुप्काळ पडला तेव्हां तो आपले राज्य सोडून, भद्रबाहु नावाचे साधूबरोबर दक्षिणप्रांतांत गेला व तो यति होऊन श्रवणबेळगोल नांवाचे म्हैसूरप्रांतांतील गांवीं राहिला. आणि शेवटी त्याने अन्न वर्ण्य करून प्राणत्याग केला. ___ चंद्रगुप्ताच्या मागून त्याचा मुलगा बिंदुसार हा त्याचे गादीवर बसला. त्याला अमित्रघात असे म्हणत असत. त्याच्या दरबारी मेगॅस्थिनीजच्याजागी डिईमेकास नांवाचा वकील नेमला. सेल्यूकसच्या मरणानंतर त्याचा मुलगा आंटिओकस सोटर हा त्याच्या गादीवर बसला. बिंदुसार व सोटर ह्यांच्या दरम्यान बरीच दोस्ती होती असे दिसते. बिंदुसाराने आंटिओकसला इराणांतील अंजीर व द्राक्षासव पाठवून देण्याबद्दल लिहिले, व तिकडील एक विद्वान अध्यापक विकत घेऊन पाठवून देण्याची विनंति केली. आंटिओकसने अंजीर व दारू पाठवून दिली, परंतु विद्वान मनुप्यासंबंधाने लिहिले की, असा मनुष्य विकणें ग्रीस देशाच्या कायद्याविरुद्ध आहे सबब तसे करितां येत नाही. बिंदुसाराचे राज्य पंचवीस वर्षे चालले. त्याने दक्षिण देशचा कांहीं भाग काबीज केला असावा असे दिसते. इजिप्तचा राजा टालेमी फिलाडेलफॉस ह्याच्याकडून डायोनिशियस नांवाचा वकील मगध देशाच्या राजाकडे पाठविण्यांत आला होता. परंतु तो अशोक राजाच्या वेळेस किंवा बिंदुसारराजाच्या वेळेस आला होता है निश्चयात्मक समजत नाही.