________________
प्रतबंदीच्या अधिकाऱ्याचे कामासारखेच होते. बागाईत व जिराईत जमिनींवर त्यांच्या मगदुराप्रमाणे सारा ठरविण्यात येत होता. शेतसाऱ्याशिवाय दुसरे पुष्कळ कर होते. शेताचे उत्पन्नापैकी राजाने एक चतुर्थांश भाग घ्यावा. लोकांच्या हिताकरितां जो मनुष्य राजाच्या स्वाधीन बहुत संपत्ति करील, त्याला राजाने मानाच्या पदव्या द्याव्या. राजाचे काम दुष्टास शासन करणे हे आहे. ह्या शिक्षा फारजवर असत. उदाहरणार्थ, आठ किंवा दहा पणांची चोरी राज्यांतील नोकराने केल्यास त्यास देहान्त शिक्षा सांगितली आहे. चाळीस किंवा पन्नास पणांची चोरी इतर माणसाने केल्यास, त्यास देहान्त शिक्षा असे. कबूल जबाब घेण्याकरितां गुन्हेगाराला मारहाण करणे सशास्त्र मानले आहे. __ याप्रमाणे चाणक्याने केलेल्या आर्थशास्त्रांतील कांहीं कांहीं नयम आहेत. यावरून त्या वेळचे राज्यव्यवस्थेचे स्वरूप चांगले समजण्यासारखे आहे. .. चंद्रगुप्ताने एकंदर चोवीस वर्षे राज्य केले. त्या मुदतीत त्याने ग्रीक लोकांची ठाणी हिंदुस्थानांतून काढून टाकिलीं; सेल्यूकसचा पूण पराभव केला; आपले राज्य पूर्व समद्रापासून पश्चिम समुद्राप्रयत स्थिरस्थावर केलें; प्रचंड सेना स्थापन केली; व एवढ्या मोच्या राज्याची अंतर्यवस्था उत्तम केली. ही कृत्य काणकार' राजास भषणास्पद होण्यासारखी आहेत. ह्या सुधारणा प्राक लोकांपासून हिंदूंनी घेतल्या असें मानण्याचे काही कारण नाही. शिकंदर बादशहा हिंदुस्थानांत फारच थोडा वेळ होता व तोही काळ लढाईचा व धामधुमीचा होता. हिंदुस्थानांतच प्राचीन काळी राज्यव्यवस्थेचे दाखले होते. चंद्रगुप्त २९७ साली मृत्यू पावला. जैन लोकांत अशी दंत