Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शेकडा चार ते दहा टक्के कर होता. जडजवाहिरावरील करांचे विशेष दर असत. खानेसुमारी खातें-नागरक नांवाचा अधिकारी असे, त्याचे काम त्याच्या हद्दीत जी माणसे येतील जातील त्यांची नोंद करण्याचे होते.. शिवाय दर एक मनुष्याची जात, नांव, आडनांव, धंदा, उत्पन्न, गुरें, खर्च, स्त्री अगर पुरुष ही माहिती ठेवण्याचे त्याचे काम होते. खोटी माहिती देण्याबद्दल शिक्षा चोरीचे गुन्ह्याप्रमाणे एखादा अवयव तोडणें ही होती. ___ मद्य विकण्यास परवाने लागत असत. परदेशांतून येणाऱ्या मद्यावर विशेष कर असत. दारूचे दुकानांत गि-हाइकास बसण्यास पलंग, खुा, वगैरे सोयी कराव्या लागत असत. ऋतुमानाप्रमाणे शेगड्या, पंखे, सुवासिक फुलें, अत्तरे वगैरेसुद्धां ठेवावी लागत असत. राजाने आपले काम फार दक्षतेने केले पाहिजे. त्याला विसावा फारच थोडा मिळणे शक्य आहे. देवांचें, ब्राह्मणांचें, क्षेत्रांचें, अज्ञानांचे, वृद्धांचे, स्त्रियांचे, दुःखितांचे व निराश्रितांचे काम त्याने स्वतः पाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे धर्माविरुद्ध आचरण करणाऱ्या लोकांवर स्वतः नजर ठेविली पाहिजे. राज्यव्यवस्थेकरितां अठरा वेगवेगळी खाती करावी. दरएक खात्यावर एक वरिष्ठ अधिकारी असावा. ___ या ग्रंथांत पगारांचे दर दिलेले आहेत. युवराजांचे वेतन दरसाल अठेचाळीस हजार रौप्यपण असावें. मजुरांचे वेतन दर साल साठ पण असावें. एक रौप्य पण म्हणजे सुमारे बारा आणे होतात. राजाने राज्याचे निधीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शेतकी खात्याचे अधिकाऱ्याचे काम सांप्रतचे मोजणीच्या व