पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मि. आर. शामशास्त्री बी. ए. यांनी केले आहे. हा ग्रंथ मौर्य साम्राज्य स्थापन होण्यापूर्वी लिहिला आहे. तो इतर प्राचीन ग्रंथकारांचे आधार घेऊन लिहिला आहे. त्यांतील नीतीचे कांहीं कांहीं दाखले पुढे दिले आहेत. राजास सल्लामसलत देण्याकरितां, बारा अगर सोळा प्रधानांचे मंडळ असे. राजाचा अधिकार अनियंत्रित असे. परंतु ब्राह्मणांचे आभिप्रायास तो मान देत असे. राजद्रोहाशिवाय ब्राह्मणांना देहान्त शिक्षा नसे. दुसऱ्या गुन्ह्याबद्दल त्यांना तोंडावर डाग देऊन हद्दपार करण्याची अथवा जन्मभर खाणीवर काम करण्याची शिक्षा असे. शेजारच्या राजांशी सख्य असणे अशक्य असल्यामुळे, जो बळवान असेल त्याने लढाई करून दुसऱ्यास जिंकावे, कारण बलाशिवाय सुरक्षितपणा मिळणे शक्य नाही. राजकारणांत बलाशिवाय दुसरी नीति नाही. भेद व युक्ति ह्या राजकरणांत अवश्य आहत. म्हणून राजाने हेर लोकांची सर्व कामांत फार मदत व्यावयास पाहिजे. __गुप्तहेर-कसविणीचा धंदा करणाऱ्या स्त्रियांचा उपयोग गुप्तहेरांचे काम करण्याकडे केला जात असे, व त्यासंबंधाने पुष्कळ नियम कलल आढळतात. गुप्त बातम्या आणणाऱ्यांना फारच मुभा असे. या राज्याचे उपयोगी पडणाऱ्या माणसांना फार सवलती असत. विकावराल कर-तटबंदीच्या शहरांत मालाच्या विक्रीप्रमाणे कर घतला जात असे. धान्य, गरें व आणखी कांहीं जिनसा शिवाय करून सव जिनसा जकातीचे नाक्यावर विकाव्या लागत असत. परगांवचे आयात मालावर शेकडा वीस टक्के कर असे. माळवें व भाजीपाला यांवर शेकडा साडे सोळा टक्के कर असे.पुष्कळ जिनसांवर ___१ हे एक म्हैसूरचे विद्वान पंडित असून त्यांनी चाणक्याचे अर्थशास्त्राचे भाषांतर केले आहे. ते हल्ली बंगलोर एथें प्रोफेसर आहेत.