पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व पाणी सोडण्याकरितां दरवाजाचा वगैरे बंदोबस्त होत असे. सुदर्शन नावाचा तलाव काठेवाडांत गिरनार पर्वताच्या शेजारी बांधला होता. चंद्रगुप्ताचा मेहुणा पश्चिम पश्चिम प्रांताचा प्रतिनिधि होता. त्याने गिरनार किल्याच्या पूर्व बाजूस एका ओढ्याचे पाणी आडवून बंधारा बांधला होता. त्याला लागणारे जरूर ते पाणी आणण्याचे पाट पुढे अशोक राजाच्या कारकीर्दीत तुशास्फ नांवाच्या सुभ्याने केले. हा तलाव चारशे वर्षे पर्यंत टिकला. पुढे तो इं. स. १५० व्या वर्षी मोठा जलप्रलय होऊन पडून गेला. पुनः तो शक क्षत्रप रुद्रदामा याने बांधला, परंतु तोहि पुढे पडून गेला. याबद्दलचा लेख गिरनारच्या माथ्यावर आहे. ज्योतिषी, तत्त्ववेत्ते, याज्ञिक वगैरे लोकांना सरकारांतून नेमणुका असत. त्यांचे सिद्धांत खरेखोटे होतील त्याप्रमाणे बक्षिसे व शासने मिळत असत. कारागीर लोक, जहाजें करणारे लोक ह्यांना सरकारांतून पगार असत. घोडे, हत्ती वगैरे वापरण्याची परवानगी लागत असे. रस्ते दुरुस्तीच्या कामावर योग्य अधिकारी नेमले जात असत. दर एक अर्धा कोशावर रस्त्यावर खांब असत. पाटलीपुत्रापासून वायव्य सरहद्दीपावेतों एक हजार मैलांचा मोठा रहदारीचा रस्ता बांधलेला होता. ___ ह्या सर्व गोष्टींवरून शिकंदर बादशहाच्या स्वारीच्या वेळेस उत्तर हिंदुस्थानांत किती सुधारणा झालेली होती, हे ध्यानात येईल. चंद्रगुप्तांच्या वेळेस झाडांच्या सालीं वर व कापडांवर लिहिण्याची वहिवाट होती. आजपावेतों मौर्य घराण्याची माहिती ग्रीक लोकांचे लेखांवरून कायती मिळण्यासारखी होती. परंतु अलीकडे चाणक्याकृत राजनीति ऊर्फ अर्थशास्त्र हा ग्रंथ उपलब्ध झाला आहे. त्याचे भाषांतर