Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारखान्यांवर देखरेख करण्याकरितां पांचवें खातें होतें. नव्या व जन्या मालाची निवड करून योग्य कर बसविण्याचे काम या खात्याकडे होते. ____सहावे खात्याचे काम, विकलेल्या मालाच्या किमतीचा दहावा हिस्सा कर म्हणून घ्यावयाचा हे असे. बाजार, देवळें, बंदरे वगैरेंचा बंदोबस्त करण्याचे कामही शहरसुधराईखात्याकडेच असे. तक्षशिला व उज्जनी यासारख्या मोठमोठ्या शहरांत पाटलीपुत्रासारखीच व्यवस्था होती. मेगेस्थिनीजने लिहिले आहे की, मी चंद्रगुप्ताच्या छावणीत असतांना तेथे सुमारे चार लक्ष लोक होते. परंतु कोणत्याही दिवशीं ऐंशी रुपयांपेक्षा जास्त चोरी झाली नाही. गुन्हेगारांना शिक्षा फार कडक होत असत. खोटी साक्ष देण्याबद्दल हाताची व पायाची बोटें तोडीत असत. पवित्र मानलेल्या झाडांस इजा करण्याचे गुन्ह्याबद्दल, विकलेल्या मालावरील जकात चुकविण्याचे गुन्ह्याबद्दल, व राजाचा स्वारी शिकारीस चालली असतांना हरकत करण्याचे गुन्ह्याबद्दल, देहान्त शिक्षा देत असे. जमिनीच्या उत्पन्नापैकीं, चौथा हिस्सा राजास द्यावा लागत असे. लढाईचे काम क्षत्रिय जातीच्या लोकांकडे असल्यामुळे, कृाषकर्म करणाऱ्या लोकांना लढाईवर जावे लागत नसे, व शेजारी मोठी लढाई चालली असतांनाहि शेतकरी लोक बिन हरकत आपली कामें करीत असत. याचें मेगॅस्थिनीलाज मोठे आश्चर्य वाटले. हिंदुस्थानासारख्या देशांत तलाव वगैरे बांधून पाणी साठवून ठेवणे, व शेताच्या कामास व पिण्यास त्याचा उपयोग करणे या गोष्टीचे महत्त्व फार आहे. चंद्रगुप्त राजाने याकारतां स्वतंत्र खास खातें ठेविले होते. त्या खात्याकडून जमिनी मोजल्या जात होत्या