पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ चा बंदोबस्त करण्याकरितां वेगवेगळी सहा खाती होती व त्यांवर एकंदर तीस अंमलदार होते. ___पाटलीपुत्र नगराकरितां शहरसुधराई खातें होतें; त्यांतही तीस अमलदार होते. दर एक खात्यास पांच सभासद याप्रमाणे सहा खाती होती. __ पहिल्या खात्याकडे उद्योगधंद्याची व्यवस्था लावण्याचे काम असे. मजूरांच्या मजूरीचे दर ठरविणे व माल चांगला आहे की नाहीं हेही पाहण्याचे काम याच खात्याकडे होते. कामकरी माणसाचे हातास किंवा डोळ्यांस इजा करण्याचे गुन्ह्याबद्दल देहांत शिक्षा होती. ___ दुसऱ्या खात्याकडे परदेशीय लोकांची व्यवस्था पाहण्याचे काम होते. त्यांच्या राहण्याची, तैनातींची व औषधपाण्याची व्यवस्था या खात्याकडून होत असे. मृत मनुष्याचे दफन करणे, त्याची मालमत्ता त्याच्या वारसाकडे पाठविणे ही कामेंही याच खात्याकडून होत असत. तिसरे खातें जन्ममृत्यूची नोंद करण्याचे होते. सरकारास आपल्या प्रजेची माहिती मिळावी, व कर बसविण्याचे कामी सोय व्हावी, म्हणून हे खाते काढले होते. ब्रिटिश राज्यांतसुद्धा या विषयाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष्य लागल्यास फार दिवस झाले नाहीत; व देशी संस्थानांपैकी पुष्कळ संस्थानांचे लक्ष अद्यापही त्या गोष्टीकडे पोहोचले नाही. ही गोष्ट ध्यानात ठेविली म्हणजे इतक्या प्राचीनकाळी चंद्रगुप्ताने या गोष्टीकडे लक्ष पोचविले हे मोठे आश्चर्यकारक वाटल्यावांचून राहणार नाही.. __ चवथें खातें व्यापाराचे होते. शिके मारलेली वजने व मापें वापरली जात की नाही हे पहाणे, व्यापाऱ्यांना परवाने देणे वगैरे गोष्टींची व्यवस्था या खात्याकडून होत असे.