________________
वाडा भव्य व प्रशस्त होता. त्याच्या खांबांस सोन्याचा मुलामा असून, त्यांवर सोन्याचे द्राक्षवेल व त्यांवर चांदीचे पक्षी कोरलेले होते. सभोंवार विस्तीर्ण बागा होत्या व त्यांत पुष्कळ कारंजी व हौद असून त्यांत नाना प्रकारचे मासे ठेवलेले असत. राजवाड्यांतील सामान चांदी-सोन्याचे होते. दोन दोन, तनि तीन, हात रुंदीची सोन्याची ताटें होती. कुशल नक्षी केलेली मेजें व खुर्ध्या होत्या. भरजरीचे मोठमोठाले झगे होते. राजाची स्वारी जाण्याची पालखी सोन्याची होती व तिला मोत्यांचे घोंस लावलेले होते. दूरचा प्रवास करितांना हत्तीवर सोन्याच्या हौदांत बसून राजा प्रवासास जात असे. हत्तींच्या, गेंड्यांच्या, पोळांच्या व एडक्यांच्या टकरांचे खेळ नेहमी होत असत. मल्लांच्या कुस्त्या, घोड्यांच्या व बैलांच्या रथांच्या शर्यती होत असत. राजाची मुख्य करमणूक म्हणजे शिकार असे. शिकारीस जातांना राजाच्या संरक्षणाकरितां बरोबर सशस्त्र स्त्रिया असत. दिवसांतून एकदा तरी राजा खुल्या दरबारांत बसत असे. त्या वेळेस लोकांचे अर्ज घेऊन तो स्वतः त्याचा निकाल करीत असे. चंद्रगप्ताची फौज मेगास्थनीच्या वेळेस एकंदर सहा लक्ष नव्वद हजार होती. त्यांत नऊ हजार हत्ती व आठ हजार रथ होते. दर एक हत्तीवर माहुताशिवाय तिघे तिरंदाज असत. रथ दोन घोड्यांचे अगर चार घोड्यांचे असत. दरएक रथावर सारथ्याशिवाय दोघे लढणारे शिपाई असत तेव्हां नऊ हजार हत्ती म्हणजे छत्तीस हजार लोक झाले व आठ हजार रथ म्हणने चोव्वीस हजार माणसे झाली. एकंदर फौजेत सहा लक्ष पायदळ, तीस हजार घोडेस्वार, छत्तीस हजार हत्तीवरील लोक व रथावरील चोवीस हजार लोक मिळून सहा लक्ष नव्वद हजार फौज होती. ह्या फौजे