पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७ होऊन त्यापति आंटिगोनयम आशियाखंडांतर नदीपर्यंत सर्व मुलूख जिंकला व त्याचे राज्य बंगालच्या आखातापासून आरबीसमुद्रापर्यंत एकछत्री झाले. ह्या सुमारास मध्य व पश्चिम आशियाखंडांत शिकंदर बादशहाचे सेनापति आंटिगोनस व सेल्युकस यांच्यामध्ये तंटे होऊन त्यांत सेल्युकसला जय मिळाला. (३१२) सल्युकसच्या मनांत शिकंदरबादशहाप्रमाणे, आपणही हिंदुस्थानावर स्वारी करून तो देश जिंकावा असे आले. म्हणून तो ३०५ साली सिंधु नदी उतरून अलीकडे आला. चंद्रगुप्ताची व त्याची लढाई होऊन सेल्यूकसचा पूर्ण पराभव झाला, व त्याला परत जावे लागले. इतकेच नव्हे, तर त्याला आपल्या प्रांतांपैकीं, पारोपनीसदी, आरिया व आराचेशिया हे प्रांत चंद्रगुप्तास द्यावे लागले. ह्या प्रांतांच्या काबुल, हिरात व कंदाहार ह्या अनुक्रमें राजधान्या होत्या. ह्यांशिवाय चंद्रगुप्तास त्याने आपली मुलगी ही दिली. (३०३). ह्याप्रमाणे दोन हजार वर्षांपूर्वी चंद्रगुप्ताने ' शास्त्रीयसरहद्दीच्या ' प्रश्नाचा निकाल करून टाकला होता. अशा प्रकारे चंद्रगुप्त हिंदुस्थानांत पहिला सार्वभौम राजा झाला. तो २०७ सालीं मृत्यु पावला. त्याच्या कारकीर्दीत एक मोठी महत्त्वाची गोष्ट झाली. ती ही की, सेल्यूकसने चंद्रगुप्ताच्या दरबारांत मेगॅस्थिनीज नांवाचा वकील नेमला. तो पाटलीपुत्र राजधानीत बरेच दिवस राहिला. त्याने हिंदुस्थानची राजकीय व सामाजिक स्थिति चौकसपणाने निरीक्षण केली व त्याचे लेखावरून त्या वेळच्या स्थितीचे आपणांस चांगले ज्ञान होते. पाटलीपुत्र नगराची लांबी सुमारे नऊ मैल होती. सभोंवार लाकडांचा मजबूत तट होता. त्याला चौसष्ट वेशी असून पांचशे सत्तर बुरूज होते. व त्यांच्या भोवताली विस्तर्णि खोल खंदक असून तो शोणनदाच्या पाण्याने नेहमी भरलेला असे. राज