________________
भाग ४ था. फिलिपासच्या खुनानंतर, शिकंदर बादशहाने त्याच्या जागी युदेमोसची नेमणूक केली. परंतु त्याच्याजवळ फौज थोडी असल्याकारणाने त्याच्याने राज्याचा बंदोबस्त करवेना. तो कसातरी ३४७ सालापर्यंत हिंदुस्थानांत राहून इराणांत निघून गेला. जातांना पोरसराजाचा विश्वासघाताने प्राण घेऊन, तो त्याचे १२० हत्ती घेऊन गेला. __सिंध प्रांतावर शिकंदराने पिथोनची नेमणूक केली होती; त्याला ही लवकरच सिंधु नदाच्या पश्चिमेस जावे लागले. ह्याप्रमाणे शिकंदराचे मरणानंतर लवकरच सिंधु नदाच्या पूर्वेकडील प्रांतावरची लोकांची ग्रीक सत्ता अजीबाद नाहींशी झाली. (इ० स० पूर्वी ३२२) अशा संधीस चंद्रगुप्त या नावाचा एक धाडसी पुरुष उदयास आला. हा मगध देशाच्या नंदवंशापैकी एक होता. परंतु मुरा नावाची त्याची आई नीच कुळांतली होती. मगध देशाचा राजा महापानद याची चंद्रगुप्तावर इतराजी झाल्याकारणाने, त्याला देश साडून पंजाबप्रांताकडे जावे लागले. तिकडे त्याने काही लोकांचा जमाव करून पंजाबप्रांत काबीज केला. तेथून आपला विजया फौज घेऊन मगध देशाच्या राज्यावर त्याने स्वारी कला, व त्याचा पराभव करून त्याला व त्याच्या बहुतेक लोकांना ठार करून आपण पाटलीपुत्राची गादी बळकाविली. नंदवंशाचे सर्व सैन्य म्हणजे सहा लक्ष पायदळ, तीस हजार घोडेस्वार, नऊ हनार हत्ती व पुष्कळ रथ त्याच्या ताब्यात आले. त्याने नर्मदा