________________
आणतां, मॅसिडोनियन लोकांनी सर्व शहरवासी लोकांची कत्तल केली. जहाजे पुढे सिंधूच्या व हीफासिस ( बिया ) नदीच्या संगमावर आली. तेथून सिंधूच्या मुखापाशीं कराचीजवळ येऊन, शिकंदर फौज घेऊन बलुचिस्थानांतून इराणांत गेला, व जहाजें इराणी आखातांत गेली. पुढे ३२३ सालच्या जून महिन्यांत शिकंदर बाबिलोन एथें एकाएकी मरण पावला. शिकंदराची स्वारी ३२७ मे पासून ३२४ चे मेपर्यंत झाली. ह्यांपैकी सिंधु नदीच्या पूर्वेस त्याने सुमारे १९ महिने घालविले. ह्या स्वारीमुळे हिंदुस्थान व युरोप यांच्यामध्ये दळणवळण वाढले. परंतु युरोपियन लोकांचा अम्मल हिंदुस्थानावर फार दिवस टिकला नाही. शिकंदर इराणांत असतानाच त्याने नेमलेला क्षत्रप फिलिपास हा मारला गेला. तीन वर्षांचे आंतच त्याने नेमलेले सर्व अमलदार हाकलून दिले गेले. बंदोबस्तास ठेविलेल्या सैन्याचा नाश झाला, व त्याचे स्वारीचा कांहीं एक मागमूसही राहिला नाही. परंतु हिंदुस्तानाचा युरोप खंडाशी संबंध तेव्हांपासून कायमचा सुरू झाला असे म्हणण्यास हरकत नाही. ) ITHC FirmS