पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ राजाला सिंधु व हिदास्पिज ह्या दोन नद्यांच्या मधला प्रांत दिला आणि त्या दोन राजांचे पूर्वीपासून वैर होते त्यांचें । त्याने आतां सख्य करून दिले. जहाजांच्या रक्षणाकरितां एक लक्ष वीस हजार फौज नदीच्या दोन्ही तीरांनी चालचालविली. पश्चिमेच्या फौजेचे सेनाधिपत्य ऋटेरास ह्यास दिले व पूर्वेकडील सैन्याचे आधिपत्य हेफेस्टिअन यांस दिले. सिंधूच्या पश्चिमेकडील क्षत्रप फिलीपोस ह्यास तीन दिवसांनी फौजेचा मागील भाग घेऊन येण्यास सांगितले. पांचव्या दिवशी हीदस्पीज (झेलम) व अकीसिनी ( चिनाब ) या दोन नद्यांच्या संगमावर जहाजे येऊन पोंचली. तेथे मुक्काम करून व आसपासच्या राज्यांवर स्वाऱ्या करून पुढच्या रस्त्याचा बंदोबस्त केला. मलोई ऊर्फ मालव व अक्षिद्रकी उर्फ क्षुद्रक ह्या दोन प्रबल लोकांचा शिकंदरावर हल्ला करण्याचा बेत समजल्यावरून, शिकंदर स्वतः त्यांच्या अंगावर चालून गेला, व त्याने त्यांचे बहुतेक लोक ठार केले. मालव लोकांचे एक तटबंदा शहर घेत असतांना, शिकंदरावर एक जीवावरचा प्रसंग आला होता. तटाच्या भिंतीवर चढण्यास शिपायास वेळ लागला म्हणून तो स्वतःच शिडी घेऊन तटावर चढला, व एकदम त्याने आत उडा टाकली. त्या वेळेस त्याचे बरोबर फक्त तीन सोबती होत. शत्रूच लोक त्याच्यावर तुटून पडले. तिघांपैकी इब्रियास नांवाचा मनुष्य लवकरच ठार झाला. शिकंदर स्वतः एका झाडाला पाठ दऊन लढत असतां, एक तीर लागन तो पडला. व्युकस्टास है। त्याचे दोन्ही बाजूंस पाय देऊन हातांत ढाल घेऊन त्याचे रक्षण करीत होता. शिकंदराची फौज अगदी बेफाम होऊन गेली. शेवटी भिंतींत खंट्या मारून कांहीं लोक भिंतीवर चढले. त्याना तेथून आंत उड्या टाकल्या, व शिकंदराचा प्राण वाचविला आणि शेवटीं शहर घेतले. तेव्हां बायकामुलांचाही विचार मनात न