________________
. २३ लागला, व चिनाब ( अकिसिनीज ) आणि रावी ( हायड्राओटीज ) या नद्या ओलांडून गेला. त्याच्या मनांतून आणखी पुढे जावयाचे होते. परंतु त्याचे लोक अगदी कंटाळून गेले होते. आपल्या देशास कधी परत जाऊं असें त्यांना झाले होते. शिकंदराने त्यांनी मिळविलेल्या जयांचे वर्णन करून व या पुढे आणखी दुसरे जय व अलोट संपत्ती मिळविण्याची आशा दाखवून उत्तेजनपर भाषण केले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी एके दिवशी त्याचा अति विश्वासू सेनापति कोईनोस ( ज्याने पोरसशी झालेल्या लढाईत मोठे शौर्य दाखविले होते ) ह्याने शिकंदराशी बोलण्याचे धाडस केलें. तो म्हणाला, " आपण आपला देश सोडल्याला आठ वर्षे झाली. त्या मुदतींत आपले पुष्कळ लोक मेले. कित्येक लोक आजारी होऊन देशास परत गेले. कित्येकांना जखमा झाल्या आहेत. आता यापुढे जाण्याची कोणाची उमेद राहिली नाही. हे भाषण ऐकून शिकंदरास फार वाईट वाटले. तीन दिवस तो कोणाच्या दृष्टीस पडला नाही, त्याने अन्नपाणी वर्ण्य केले. परंतु शेवटी नाइलाज होऊन त्याने परत फिरण्याचा बेत कायम केला. नदीच्या पलीकडे त्याने बारा भव्य रणस्तंभ उभारले. एवढे मोठे सैन्य परत नेण्याची तयारी करणे म्हणजे लहानसहान काम नव्हते. त्याने समुद्राच्या रस्त्याने परत जाण्याचा बेत कायम केला, व त्याकरितां त्याने तीस तीस वल्ह्यांची अशी मोठमोठाली ८० जहाजें व शिवाय घोडे व सामान नेण्याकरितां म्हणून एकंदर सुमारे दोन हजार नांवा तयार करविल्या. आपल्या देशास परत जाण्याकरिता निघण्याचे पूर्वी, हिंदुस्थानच्या राजांचे वकील व आपले अंमलदार ह्यांच्या समक्ष हिदास्पीज व हिफासीस नद्यांच्या मधील सर्व प्रांताचा राजा पोरस आहे असे त्याने जाहीर केले व तक्षशिलेच्या