Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यामुळे हत्ती बेफाम झाले, व ते आपल्याच लोकांवर धावून जाऊं लागले. हा घोटाळा चालला आहे तो नदीच्या दुसऱ्या बाजूस शिकंदराने जी फौज ठेविली होती ती ताजीतवानी चाल करून आली, व हिंदी फौजेचा पूर्ण पराभव झाला. पोरसचे तीन हजार घोडेस्वार व बारा हजार पायदळ मारले गेले; नऊ हजार लोक कैदी झाले. शिकंदराकडील फक्त एक हजार लोक पडले. पोरस राजा मोठा धिप्पाड व शूर पुरुष होता; तो शेवटपर्यंत सारखा लढत होता. त्याला नऊ जखमा झाल्या व मूर्छा येऊन तो खाली पडला, तेव्हां शत्रूने त्यास पकडले. शिकंदराला त्याच्या शौर्याचे मोठे कौतुक वाटले. त्याने त्याला विचारिलें, “ आपणास आम्ही कोणत्या रीतीने वागवावें ? " पोरस म्हणाला, “ राजाप्रमाणे " शिकंदर म्हणाला, " हे तर आम्ही आपण होऊनच करूं परंतु आपण आपली विशेष इच्छा कळवावी.” पोरस म्हणाला, “ त्या एका शब्दांत सर्व गोष्टींचा समावेश होतो." शिकंदराने त्याच्या ताब्यांत त्याचे सर्व राज्य ठेविले. इतकेच नव्हे तर जास्त मुलूखही त्याच्या ताब्यांत दिला.व या कृत्याने त्याने आपणाला एक कृतज्ञ व विश्वासू दोस्त जोडली. शिकंदर बादशहाने आपला बसावयाचा घोडा बुसीफेलस नांवाचा होता, त्याच्या नावाने एक शहर वसविले व ज्या ठिकाणी आपला जय झाला त्या ठिकाणी निकाया नांवाचे शहर वसविलें. ह्यानंतर पूर्वेकडे तो जाऊं १ मक्स डंकरचे हिस्टरी ऑफ एंटिक्विटी नांवाचे ग्रंथांत लिहिलें आहे की, पोरसवर शिकंदराने हल्ला केला तेव्हां शिकंदराची फौज पोरसच्या दुप्पट होती. व शिवाय तक्षशीलेचा राजा मोफिस याची ५००० त्याला येऊन मिळाली. त्याचे म्हणणे क्लिओफिस नांवाच्या हिंदू राणीच्या फौजेचा शिकंदराने विश्वासघाताने नाश केला. हिंदु सुपिरिआरटी; हर बिलास सार्डा, पृ. १२७, १२८.