________________
२० नदीजवळ आला तेव्हां नदीच्या पैलतीरावर पोरस राजा पन्नास हजार फौजेसह लढाईस तयार असलेला त्याच्या दृष्टीस पडला. पुराने भरलेली नदी ओलांडून इतक्या मोठ्या सैन्याशी घोडेस्वारांना युद्ध करणे बहुतेक अशक्य होते. हिवाळ्यांत नदी, पाणी कमी होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. परंतु शिकंदरासारख्या उत्साही व धाडशी वीराला इतके दिवस स्वस्थ बसणे कसें रुचेल ? त्याने लढाई ताबडतोब करण्याचा निश्चय केलाच, परंतु कुशल सेनापतीस शोभेल अशी युक्ति काढली. त्याने सर्व लोकांत आपण हिवाळ्यापर्यंत युद्ध करणार नाही अशी भुमका पसरूं दिली. परंतु पोरस राजाच्या सैन्यास विसावा न मिळावा म्हणून आपल्या फौजेचा काही भाग सारखा इकडून तिकडे तो फिरवीत होता. तथापि त्याने गुप्त रीतीने काही वेगळाच बेत ठरविला होता. फौजेच्या मुख्य तळापासून वरच्या बाजूस सुमारे १६ मैलांच्या अंतरावर नदीत एक बेट होते. त्या बेटाजवळ तो स्वतः सुमारे १२ हजार निवडक फौज घेऊन लांब रानांतून गेला. व रात्रीच्या वेळेस ती फौज घेऊन त्या बेटांत उतरला. परंतु त्या बेटापासून पलीकडच्या तीरापर्यंत नदीचा भाग चिंचोळा खरा, परंतु फार खोल असा होता. तथापि त्याने त्यांत घोडेस्वार घातले. घाज्याचा तोडे मात्र पाण्यावर राहिली होती. पहांटेच्या समारास तो पैलतीरावर आपल्या निवडक स्वारांसह उतरला. पोरस राजाच्या मुलाच दृष्टीस ही गोष्ट पडतांच तो दोन हजार घोडेस्वार व १२० रथ घेऊन आला. शिकंदराने त्या फौजेचा ताबडतोब पराभव केला व ४०० लोक ठार केले. पोरस राजाचा तळ तेथून दूर होता. तो आपली फौज लढाई करण्याकरितां घेऊन आला. त्याने आपल्या फौजेची व्यवस्था केली ती येणेप्रमाणे: २०० हत्ती सर्व फौजेच्या पुढे शंभर शंभर फुटांच्या अंतरा